esakal | जळगाव जिल्ह्यात ११ ऑक्सिजन प्लांटची होणार निर्मिती

बोलून बातमी शोधा

oxygen plant
जळगाव जिल्ह्यात ११ ऑक्सिजन प्लांटची होणार निर्मिती
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची टंचाई, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची टंचाई आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले आहेत. कोणाच्या नातेवाइकांना त्वरित ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना जग सोडून जावे लागले आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात सुमारे दहा ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहेत. या प्लांटमध्ये हवेतील २१ टक्के ऑक्सिजन शोषून त्याद्वारे सिलिंडर भरली जातील. मोहाडीतील रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणाबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लहान-मोठे ऑक्सिजन लांट असतील.

हेही वाचा: भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

आगामी काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा ऑक्सिजन प्लांटचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होऊन आगामी महिना दीड महिन्याच्या कालावधीत प्लांट तयार होतील.

या ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट...

मोहाडी येथील महिला रुग्णालयात १०२० एलपीएम क्षमतेचा सर्वांत मोठा प्लांट असेल. या ठिकाणावरून २२५ सिलिंडर प्रतिदिन ऑक्सिजन तयार होईल, तर चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी प्रत्येकी ४१५ एलपीएम क्षमतेचे प्लांट असतील. त्याद्वारे प्रत्येकी ७५ सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल. अमळनेर, पारोळा, रावेर, भडगाव, धरणगाव या ग्रामीण रुग्णालयात १७० एलपीएम क्षमतेचे प्लांट तयार होतील. त्याद्वारे प्रत्येकी ३५ सिलिंडर तयार होतील. यामुळे विपुल प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती जिल्ह्यात होईल.

हेही वाचा: जि.प.अध्यक्षांचे पतीसह स्पेशल लसीकरण ! आणि भाजप कार्यकर्त्यांचा घरचा आहेर

भुसावळचा ऑक्सिजन प्लांट तयार

भुसावळ येथील नवोदय विद्यालयाजवळील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १७० लिटर परमिनिट (एलपीएम)चा ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एक-दोन दिवसांत त्याद्वारे ऑक्सिजननिर्मिती सुरू होणार आहे.

हेही वाचा: हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने

जिल्ह्यात अकरा ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे नियोजन आहे. भुसावळ येथे ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे. लवकर त्याद्वारे ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. इतर ठिकाणी आगामी एक ते दीड महिन्यात प्लांट तयार केले जातील. यामुळे जिल्हा आगामी काळात ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

संपादन- भूषण श्रीखंडे