जळगाव जिल्ह्यातील १४ कृषि केंद्र चालकांना नोटीसा

जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी याप्रमाणे सर्व अभिलेख अद्यावत ठेवावे.
agricultural centers
agricultural centersagricultural centers


जळगाव ः कृषि विभागातर्फे (Department of Agriculture Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची (Agricultural Service Center) तपासणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अभिलेख्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या असून अशा १४ विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर (Agriculture Officer Sambhaji Thakur) यांनी दिली. (jalgaon district notice to the drivers of fourteen agricultural centers)

agricultural centers
१५ दिवसात रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटीचे नुकसान !

जिल्ह्यात, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांद्वारे तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणीत बियाणे, खत व किटकनाशके विक्री परवान्याची तपासणी, साठा व भाव फलकदर्शनी भागात लावणे, साठा व विक्री रजिस्टर अद्यावत ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या सर्व निविष्ठांचा स्त्रोतांचा समावेश परवान्यात करणे, बिल बुक, मुदतबाह्य साठा, कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक प्रदर्शित करणे, गोदामातील खतसाठा तपासणी, मासिक विक्री अहवाल सादर करणे आदि बाबींची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी याप्रमाणे सर्व अभिलेख अद्यावत ठेवावे.

Farmer
FarmerFarmer

तर कठोर कारवाई
जे केंद्र चालक शेतकरी बांधवांना जादा दराने, अनधिकृत, बोगस कृषि निविष्ठांची विक्री करतांना आढळतील, त्यांचे अभिलेख अद्यावत नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com