esakal | पोळा उत्साहात साजरा; पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदीत
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Jayashree Mahajan Pola Puja

पोळा उत्साहात साजरा; पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव ः शेतकऱ्यांचा (Farmer) मित्र सर्जाराजा (बैल) (ox) यांचा आज पोळा सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदा वरूणराजाने कृपा केल्याने रुसलेला पाऊस (Rain) चांगला सुरू झाल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांची पारंपारीक पध्दतीने पूजा करून गावात बैलांना मिरवण्यात आले.

हेही वाचा: रेल्वे किमेनची सतर्कता आणि धाडसामूळे मोठी दुर्घटना टळली..!

घरोघरी बैल घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांचा नागरिकांनी नारळ देवून सत्कार केला. बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला. दूपारी शहरासह जिल्ह्यात काही मिनीटे जोरदार पाउस झाल्याने पोळा सणाचा उत्साह द्विगुणीत झाला होता. तसेच जळगावचे महापौर जयश्री महाजन व विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांनी त्यांच्या मेहरुण येथील निवास्थानी बैलांचे पुजन केले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात..एका दिवसात लाखावर लसीकरण


पांजरापोळ संस्था
शहरातील १३० वर्ष जुनी पांजरापोळ संस्था कार्यरत आहे. तेथे जवळपास अकराशे वृध्द, आजारी, अपंग गाई व शंभर वळूंचे संगोपन केले जाते. आज पोळ्यानिमित्त सर्व ट्रस्टी, कर्मचारी, शहरातील अनेक भाविकांचा उपस्थितीत पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. कर्मचाऱ्यांनी सकाळी सर्व बैलानां आंघोळ घालुन नवीन दोर, नाथ, मोरखी, पैजण, गोंडे, गेठा, कवडी माळ, हार गजरे, झूल घालुन सजलिवे. ट्रस्टी विजय काबरा, दिलीप गांधी, अशोक धुत, लक्ष्मीनारायण मणियार, नाना वाणी, हर्षद दोषी , राघवजी सतरा, दिलीप व्यास यांचा हस्ते सर्व बैलांची पूजा करण्यात आली. त्यांना पूरण पोळी, भिजवलेली चनादाळ , गुळ खाऊ घालण्यात आला. नंतर सर्व बैलानां मारूती मंदीरात दर्शनासाठी नेण्यात आले. यावर्षी एक जोडी नवीन झुल ट्रस्टी दिलीप गांधी यांचा तर्फे संस्थेस भेट देण्यात आली.

loading image
go to top