esakal | उत्‍तर महाराष्‍ट्रात नंबर वन पक्ष बनवूया : खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले. जळगावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सकाळी दहाला ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले. त्यावेळी त्यांचे राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्‍त्‍यांनी स्वागत केले.

उत्‍तर महाराष्‍ट्रात नंबर वन पक्ष बनवूया : खडसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दसऱ्याला सीमोल्‍लंघन केले जाते. रामाने याच दिवशी अन्यायाचे निर्दालन केले होते. त्‍यानुसार समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे. याकरीता सर्वांनी एकत्र काम करून उत्‍तर महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादीला एक नंबरचा पक्ष बनवूया असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. 

मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले. जळगावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सकाळी दहाला ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले. त्यावेळी त्यांचे राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्‍त्‍यांनी स्वागत केले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्‍लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील. महिला आघाडीच्या कल्पना पाटील, अजय बढे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे उपस्थित होत्या. तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडसे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतरचा पहिला दिवस आहे. आज दसऱ्याचे सीमोल्लंघन आहे. या दिवशी रामाने रावणाचा नाश केला होता. अन्यायाचे निर्दालन केले होते. त्यामळे आज महत्वाचा दिवस आहे. समाजात असलेल्या घटनाबाह्य, अन्याय कारक बाबींचे आपणास निर्दालन करावयाचे आहे. आपण सर्वांनी एकत्र कार्य करून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकाचा पक्ष बनवायचा आहे.

loading image