esakal | अमित शहा, नड्डांकडे तक्रार; मोदींचीही घेतली भेट, पण.. 
sakal

बोलून बातमी शोधा

khadse amit shah

भाजपच्या सदस्यत्वाचा त्याग करताना खडसेंनी फडणवीसांमुळे ही वेळ आल्याचे जाहीर केले. त्यावर फडणवीस यांनी खडसे अर्थसत्य सांगत असून आपण योग्यवेळी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली.

अमित शहा, नड्डांकडे तक्रार; मोदींचीही घेतली भेट, पण.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर/जळगाव : माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी अमित शहा, जे. पी. नड्डा यांना भेटून कैफियत मांडली होती. परंतु, माझ्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीच्या माहितीची पेरणी झाल्याने न्याय मिळू शकला नाही, असे सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यानुसार मी अर्धसत्य बोलत असेल तर त्यांनी नेमके काय घडले, हे त्यांनीच सांगावे, असे आव्हानही दिले. 

नक्‍की पहा- खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर


भाजपच्या सदस्यत्वाचा त्याग करताना खडसेंनी फडणवीसांमुळे ही वेळ आल्याचे जाहीर केले. त्यावर फडणवीस यांनी खडसे अर्थसत्य सांगत असून आपण योग्यवेळी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत खडसे आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, माझ्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, व्ही. सतीश आदी नेत्यांना भेटलो. पण फडणवीसांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी माझ्याबाबतीत चुकीची माहिती वरिष्ठांकडे सादर केली होती. त्यामुळेच मला न्याय मिळू शकला नाही. 

.. तर त्यांनी सत्य सांगावे! 
फडणवीस आता म्हणत आहेत की, या प्रकरणात एकच बाजू मांडली, योग्यवेळी बोलेल. पण, मी गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने याबाबत बोलतोय. माझा गुन्हा काय, काय दोष आहे, याचा जाब विचारतोय. परंतु, त्यावेळी फडणवीस काहीही बोलले नाही. त्यांना सत्य मांडायचे असेल आणि त्यांच्याकडे असेल तर ते त्यांनी सांगावेच, असे आव्हानही खडसेंनी दिले. 
 
माजी आमदार सोबत, विद्यमान नंतर.. 
पक्षाकडून न्याय मिळाला नाही, म्हणून समर्थकांशी बोलून आपण पक्षांतर केले. माझ्यासोबत आणखी १५-१६ माजी आमदार आहेत, ते शुक्रवारी (ता.२३) मुंबईत येतील. विद्यमान आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे अडचण आहे. परंतु, नंतर तेदेखील टप्प्याटप्प्याने सोबत येतील, असेही खडसे म्हणाले. 
 
खडसे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना 
शुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादीत प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर खडसे आज सपरिवार मुंबईला गेले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर आलेल्या हेलिकॉप्टरने खडसे मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी तथा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर, खडसेंचे केअर टेकर गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.