esakal | खडसेंचे कोथळीत जल्लोषात स्वागत; स्नुषा रक्षा खडसेंनी केले औक्षण !  
sakal

बोलून बातमी शोधा

खडसेंचे कोथळीत जल्लोषात स्वागत; स्नुषा रक्षा खडसेंनी केले औक्षण !  

खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे खडसेंचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी मंदाताई खडसे, रोहिणी खडसे-खेवलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

खडसेंचे कोथळीत जल्लोषात स्वागत; स्नुषा रक्षा खडसेंनी केले औक्षण !  

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः मुंबईत शुक्रवारी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर जळगावला परत येत असतांना धुळेच्या वेशीवर तसेच धुळे जिल्ह्यात खडसेंचे जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी व खडसे समर्थकांनी केले होते. तर आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व घोषणा देवून स्वागत केले. त्यानंतर खडसेंचे गाव कोथळीत जल्लोषात स्वागत झाले. यावेळी त्यांच्या स्नुषा भाजप खासदार रक्षा खडसेंनी खडसेंचे औक्षण केले.  

भाजपच्या नेत्यांवर नाराजी दाखवीत एकनाथ खडसेंनी भाजप सदस्याचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रवेश केला. त्यानंतर जळगावला परत असतांना शनिवारी धुळे येथे तर आज जळगावात एकनाथ खडसे, मंदा खडसे, रोहिणी खडसेंचे स्वागत करण्यात आले. तर मुक्ताईनगर येथील कोथळी गावात खडसें दुपारी घरी पोहच्यावर जल्लोषात स्वागत कार्यकर्त्यांनी केले. तर खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे खडसेंचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी मंदाताई खडसे, रोहिणी खडसे-खेवलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मी भाजपातच 
सासरे एकनाथ खडसेंनी भाजप सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर खासदार रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया देत बाबांनी घेतलेल्यावर निर्णयामुळे दुःख होतेय. परंतू मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपकडे बघून मला निवडून दिले आहे त्यामुळे भाजपातच राहणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी देईल मी पूर्ण करेल असे स्पष्ट केले.