esakal | एमआयडीसीत विजेच्या लोडशेडींगमूळे उद्योजक हैराण !
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीत विजेच्या लोडशेडींगमूळे उद्योजक हैराण !

अनेक उद्योजकांनी तक्रारी अगोदरच केल्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अनेक गावे या सेक्टरच्या सबस्टेशवर जोडली असल्याने विजेचे भार नियमन होते.

एमआयडीसीत विजेच्या लोडशेडींगमूळे उद्योजक हैराण !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव  ः येथील एमआयडीसी’तील ‘व्ही’ व ‘एम’सेक्टरमध्ये विजेचे अती प्रमाणात लोड शेडींग होत असल्याने उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते आहे. याबाबत आज उद्योजकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतलेल्या उद्योग मित्र बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी य परिसरात तातडीने नवीन ट्रान्सर्फामर बसवून विजेचे दाब नियंत्रित करावा. सोबतच याच परिसरासह शिरसोली, मोहाडी, चिंचोली येथे विजेचे स्वतंत्र सबस्टेशन तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. 

आवश्य वाचा- खडसेंच्या प्रवेशाने उत्‍तर महाराष्‍ट्रात नवीन परिणाम : अरूणभाई गुजराथी

जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. लघू उद्याेग भारतीचे येथील अध्यक्ष किशोर ढाके, सचिव समीर साने, पाईप मॅन्यूफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लढढा, रवि फालक, भाजपा उद्योग आघाडीचे संतोष इंगळे, एमआयडीसीचे उपअभियंता मिलींद पाटील, महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते. 


व्ही व एम सेक्टरमध्ये विजेचे भारनियमन मोठ्या प्रमाणात होते. कधी विजेचे दाब एकदम जास्त तर कधी एकदम कमी होतो. यामुळे कंपनीमध्ये काम करताना नुकसान होते. याबाबत अनेक उद्योजकांनी तक्रारी अगोदरच केल्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अनेक गावे या सेक्टरच्या सबस्टेशवर जोडली असल्याने विजेचे भार नियमन होते. जोडलेली गावे वेगळी काढून दुसरया सबस्टेशनवर टाकली तर विजेचे भारनियमन कमी होईल. अशी बाजू अधिकाऱ्यांनी मांडली. लवकरात लवकर एमआयडीसीत तात्पूरते अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसवावे, चिंचोली, शिरसोली, मोहाडी येथे स्वतंत्र सबस्टेशनचा प्रस्ताव द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 


फायर स्टेशन पुन्हा एमआयडीसीकडे 
एमआयडीसीतील फायर स्टेशन पूर्वी एमआयडीसीकडे होते. नंतर महापालिकेकडे ते देण्यात आले. मात्र त्यात योग्य ती व्यवस्था ठेवली जात नसल्याने ते सबस्टेशन ‘एमआयडीसी’कडेच द्यावे अशी मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच फायर स्टेशन एमआयडीसीकडे देण्याचे सूचना केली. महापालिकेने त्याबाबत प्रस्ताव तयार करावा असे सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे