उमवि अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणार, कशी असणार त्यासाठी वाचा !  

सचिन जोशी
Tuesday, 8 September 2020

१५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व १ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा होऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर केले जातील. 

जळगाव : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी असणार आहे. 

आवश्य वाचा ः संवेदनशील जिल्हाधिकारी राऊतांमूळे पत्रकाराचे वाचले प्राण, अन पुण्याची पुनरावृत्ती टळली !

अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व १ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा होऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर केले जातील. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी या परीक्षांच्या स्वरूपाविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य शासनाने या परीक्षांचे स्वरूप ठरविण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक पातळीवर परीक्षा आयोजन व वेळापत्रक निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीने दिलेल्या शिफारशींचा अहवाल नुकताच विद्यापीठाच्या विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी घेण्याचा निर्णय झाला. 

वाचा ः कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर कंत्राटदार कंपनी डल्ला 
 

अशी होईल परीक्षा 
पदवी परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा राहणार असून परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांची असेल. तर पदव्युत्तर परीक्षेसाठी ६० गुणांची परीक्षा व १२० मिनिटांचा कालावधी असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर पासून सुरु होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळा‍वर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon final year exams will be taken online by the university starting from one october