
फायर, इलेक्ट्रीक ऑडिट न केल्यास हॉस्पिटलची मान्यता होणार रद्द !
जळगाव ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात खासगी ४५ कोविड हॉस्पिटल्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजन ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हा शल्यकिचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सर्व कोविड हॉस्पिटलला दिल्या आहेत. ऑडीट न केल्यास मान्यता रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा: वय वर्षे 80 स्कोअर 15..तरी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात
नाशिक, विरार, दिल्ली येथे कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. याची जळगाव शहरासह जिल्ह्यात पुनरावृत्ती होवू नये. यासाठी ऑडीट करण्याबाबतची मागणी होत होती. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटल्सांना नोटीस बजावली आहे. कोविड हॉस्पिटल्सनी फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजनचे ऑडीट करुन त्याची एन.ओ.सी. दोन दिवसात सादर करावी अशा आशय नोटीसीत आहे.
हेही वाचा: गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान
जिल्ह्यातील मान्यता प्राप्त हॉस्पिटल्सना फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजनचे ऑडीट करण्यासंदर्भात वारंवार सुचना देवून पत्र देखील देण्यात आले आहेत. मात्र अद्यापर्यंत एनओसी सादर केलेली नाही. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधित हॉस्पिटलच जबाबदार राहील असा इशारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Jalgaon Fire Electric Audit Not Done Recognition Hospital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..