esakal | वय वर्षे 80 स्कोअर 15..तरी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

वय वर्षे 80 स्कोअर 15..तरी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात

वय वर्षे 80 स्कोअर 15..तरी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात

sakal_logo
By
- संजय पाटील

पारोळा ः मन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण या युक्तीप्रमाणे करंजी ता,पारोळा येथील 80 वर्षीय निंबा ओंकार रोकडे यांचा एचआरसिटी स्कोअर 15 असतांना देखील स्वःआत्मविश्वासाने त्यांनी कोरोनावर मात करित ते सुखरुप घरी परतले. यावेळी सरपंच भैय्यासाहेब रोकडे व ग्रामस्थ व नातेवाईक यांनी त्यांचा सत्कार करित आनंद साजरा केला.

हेही वाचा: गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच थैमान घातले असुन रोजच रुग्णसंख्खा वाढत आहे.करंजीचे रहीवाशी निंबा रोकडे यांची तपासणी दरम्यान कोरोना चाचणी पाँझिटिव्ह आली.यावेळी एच.आर.सि.टी स्कोअर तपासणी 15 आल्याने नातेवाईक घाबरले. मात्र स्वत: निंबा रोकडे यांनी मनाशी खुणगाठ बांधीत मला पारोळ्याच्या कुटीर रुग्णालयात दाखल करा असे सांगितले.यावेळी सरपंच भैय्यासाहेब रोकडे व नातेवाईक यांनी उपचारासाठी दाखल केले.यावेळी वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे त्यांच्या टिम ने सर्वोतोपरी औषधोपचार करित 7 दिवसात ते पुर्णपणे बरे होवुन घरी परतले.स्वआत्मविश्वास व डाँक्टरांची देखभाल यामुळे 80 वर्षीय निंबा रोकडे यांनी कोरोनावर मात केली.नातेवाईक,ग्रामस्थ व डाँक्टरांचे योग्य निदान यामुळे मला पुनश्च जीवनदान मिळाले.

हेही वाचा: रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !

गावकऱ्यांची मदत..

दरम्यान करंजी गावात बाधीत रुग्णांसाठी ग्रामपंचायत सरपंच भैय्यासाहेब रोकडे व त्यांचे सहकारी सर्वोतोपरी मदत करित असल्यामुळे गावात एकही अँक्टीव्ह रुग्ण नसुन बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यावेळी करंजी सरपंच भैयासाहेब रोकडे, माजी सरपंच बी एस पाटील सर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास रोकडे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे ,नाना,रोकडे, नागो माळी ,निंबा माळी ,संदीप रोकडे ,प्रवीण बडगुजर, आशा स्वयंसेविका कल्पना महाजन, नंदु रोकडे व ग्रामस्थ कोरोना काळात चांगले सहकार्य करित आहे.

हेही वाचा: चोर तर चोर..वरून शिरजोर ! काळा बाजार करणाऱ्यांनी पोलिसांनाच केली मारहाण

पहील्या लाटेत औषधोपचार देवुन 14दिवस होमकोरंटाईन केले की रुग्ण बरे होत होते.मात्र दुसर्या लाटेत मनाची भितीने रुग्णांचे आँक्सीजन लेव्हल कमी होणे याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी स्वःआत्मविश्वास दृढ राहीला तर औषधोपचाराबरोबर कोरोना वर हे रामबाण औषध आहे.आजार अंगावर न काढता तात्काळ निदान करुन डाँक्टरांचा सल्ला घेवुनच औषधी घ्यावेत असे आवाहन कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी सांगितले.

डॉ. योगेश साळुंखे वैद्यकिय अधिकारी कुटीर रुग्णालय,पारोळा

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image