जळगाव जिल्‍हयात आज ४३ नविन कोरोना बाधीत रुग्ण  

भूषण श्रीखंडे
Saturday, 7 November 2020

दिवाळीच्या सणासुदीत नागरीक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. रोज मर्यादित संख्येने रुग्णवाढ होतच असल्याने अद्यापही संसर्गाचा धोका टळलेला नाही.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नविन कोरोना बाधितांच संख्या थोडी-थोडी वाढत आहेत. आज जळगाव जल्‍हयात ४३  नविन कोरोना बाधित रुग्णे सापडले आहे. तर जिल्ह्यातील भडगाव येथील ७८ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ५२ रुग्ण बरेही झाले.

आवश्य वाचा- निकाल निगेटिव्ह तरी जल्लोष; अनोख्या "शंभरी"चे असे ही दर्शन !
 
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आलेला असल्याचे दिसत असले तरी दिवाळीच्या सणासुदीत नागरीक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. रोज मर्यादित संख्येने रुग्णवाढ होतच असल्याने अद्यापही संसर्गाचा धोका टळलेला नाही. शनिवारी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ५३२ झाली आहे. दिवसभरात ५२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्याही ५१ हजार ६३९ वर पोचली असून, हे प्रमाण ९६.४६ टक्के आहे. 

जळगावात पुन्हा वाढ 
जळगाव शहरात पुन्हा रुग्णवाढ झाली. शनिवारी शहरात ११ रुग्ण आढळले. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण असे : जळगाव ग्रामीण १, भुसावळ ८, अमळनेर १, चोपडा ३, भडगाव ८, रावेर १, पारोळा ३, चाळीसगाव ४, बोदवड ३. 

दिवाळी खरेदीसाठी गर्दी

दिवाळीसण काही दिवसावर आलाच असून बाजारात कपडे, साहित्य, वस्तू खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. यात अनेक दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून कोरोना सुरक्षेची कोणतीच खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पू्न्हा दुकानादारांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यासाठी सक्ती करण्याचे काम हाती घ्यावे लागू शकते. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon forty-three new corona patients in Jalgaon district today