कॅबिनेटमध्ये आता माझी मान ताठ राहणार ! 

कॅबिनेटमध्ये आता माझी मान ताठ राहणार ! 
Updated on

जळगाव  ः जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅबच्या चाचणीसाठी लॅब नव्हती. यामुळे कोरोनोचा विषय कॅबिनेटच्या मिटींगमध्ये निघाला अन जळगावचे नाव आले की माझी मान खाली जायची. पण आता मात्र जिल्ह्यात आपली स्वतःची टेस्टींग लॅब, ऑक्सिजन बेड, व्हेटींलेटर अशा सर्व अत्याधुनीक सेवा उपलब्ध झाल्याने कोरोना बाधीतांचा मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा सुविधांबाबत ‘ससून’ रुग्णालयाचाही पुढे आल्याने आता कॅबिनेटच्या बैठकीत माझी मान अभिमानाने ताठ राहील, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. 

जिल्हा कोविड रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन बेड वॉर्डाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कोविड रुग्णालयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.सी. चव्हाण,रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट, सचिव जितेंद्र बरडे, चेअरमन महेंद्र रायसोनी उपस्थित होते. 

ससुन पेक्षा ही चांगली आपली यंत्रणा- मंत्री पाटील  
मागील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणेसह आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचे तातडीने निदान करण्यासाठी टेस्टींग लॅबची मागणी केली. राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा मी केल्याने टेस्टीग लॅब आपल्याला मिळाली. अन्यथा पूर्वी चार ते आठ दिवसानंतर येणारे अहवालाच्या तक्रारी, रुग्णांच्या तक्रारी, आरोग्य सुविधांची वानवा असे अनेक प्रश्‍न होते. ते प्रश्‍न या लॅबमुळे निकाली निघाले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कौतुक केले आहे. सोबतच कोरेाना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट हात आहे, मृत्यू दरही खाली आहे. आरोग्य यंत्रणा अत्याधुनिक झाली आहे. मुंबईच्या ससून रुग्णालयांपेक्षाही चांगल्या सुविधा जळगावला मिळत आहे. सामाजीक संघटनांनी केलेल्या सहकार्यामुळे व अधिकाऱ्यांच्या 
कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळातही सामाजिक संस्थांनी सहकार्य ठेवावे. 

वाचा ः केळी निर्यात वाढविण्याची जबाबदारी ‘अपेडा’वर; जळगाव, कोल्‍हापूर, सोलापूरची निवड 
 

ते म्हणाले, की आगामी काळात रुग्ण संख्या वाढली तरी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आगामी काळातील दुर्गात्सवासह अनेक सण भाविकांनी, नागरिकांनी सोशल डिस्टनींगचे पालन करीत साजरे करावेत. सर्वांनी कोरोना बाबत काळजी घ्यावी. तोंडाला मास्कचा वापर नेहमी करावा. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Poverty Forces Farmer to Harness His Children for Farming in Maharashtra's Jalgaon
Jalgaon woman assaulted under false promise of marriage
Why is monsoon delayed in North Maharashtra?
Shirpur leopard captured after chicken bait operation
Marathi News Esakal
www.esakal.com