यंदाच्या पावसाळ्यात..तब्बल नऊ वेळा भरले हतनूर धरण

हतनूर धरणात ६० ते ७० टक्के गाळ आहे. हा गाळ असल्याने धरण १०० टक्के भरू दिले जात नाही.
Hatnur Dam
Hatnur Dam


जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस (Heavy Rain) पडल्याचा दावा प्रशासन करते. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाईवर (Water scarcity) मात करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा आहे. हतनूर धरणातील (Hatnur Dam) गाळामुळे हतनूर धरणातून आतापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात नऊ वेळा हतनूर धरण भरेल. त्यातून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी सुरतमार्गे गुजरातमध्ये वाहून गेले, अशी माहिती हतनूर धरणाचे कार्यकारी अभियंता एन. एम. महाजन यांनी दिली.

Hatnur Dam
गावाला येऊन आईची भेट घेतली..अन हीच भेट शेवटची ठरली


यंदाच्या पावसाळ्यात मध्य प्रदेश, विदर्भात दमदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने हतनूर धरण भरले. तापी नदीवाटे सतत दोन महिन्यापासून पाणी सोडले जात आहे. यंदा आतापर्यंत तब्बल ९ वेळा हतनूर धरण भरेल. एवढे पाणी तापी नदीत सोडण्यात आले. हतनूर धरणाला उजवा कालवा आहे. मात्र, डावा कालवा नाही. डावा कालवा असता तर वाया जाणारे पाणी या कालव्याद्वारे सोडून जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविता आले असते, दुसरीकडे निम्म्या जिलह्यातील पाणी टंचाई मिटली असती.


गाळाचा मोठा प्रश्‍न
हतनूर धरणात ६० ते ७० टक्के गाळ आहे. हा गाळ असल्याने धरण १०० टक्के भरू दिले जात नाही. जसी पाणी पातळी वाढू लागते तसतसे पाणी दरवाजेद्वारे तापी नदीत सोडले जाते. शंभर टक्के भरून पाणी सोडल्यावर महापूराचा अनेक गावांना धोका असतो. यामुळे धरणातील पाण्याची लेव्हल वाढू लागताच दरवाजे सुरू केले जातात.

Hatnur Dam
वाघूर धरण शंभर टक्के भरले..२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

४१ दरवाजे २ वेळा उघडले
यंदा या धरणाचे ४१ दरवाजे दोन वेळ पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्याद्वारे निघणारा पाण्याचा जलप्रपात पाहण्यासारखा असतो. गत महिन्यात सलग पाच दिवस ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तापी नदीचे पाणी अडविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीचे सुमारे २०० ते ३०० टीएमसी पाणी गुजरात राज्याच्या दिशेने वाहून जाते. तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केला, तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर सिंचन प्रकल्पासारखे धरण ९ वेळा भरेल, एवढे पाणी दरवर्षी डोळ्यादेखत वाहून जात आहे.


Hatnur Dam
उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा

येथे आहे तापीचा उगम
मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी ही खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी गंगा समजली जाते. तापीचा उगम मध्य प्रदेशातून झाला असला तरी तिचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मध्य प्रदेश, विदर्भासह पूर्णा नदीच्या पुरामुळे तापी नदी दुथडी भरून वाहते. परंतु तापी नदीवर मोठे सिंचन प्रकल्प नसल्याने हे पाणी गुजरातच्या दिशेने वाहून जाते. पुढे ते उकई सिंचन प्रकल्पातून थेट समुद्रात जाऊन मिळते. वर्षानुवर्षे हे चक्र सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com