बंटी-बबलीने बँकेला लावला चुना; नकली सोन्यावर साडेआठ लाखांचे काढले कर्ज 

रईस शेख
Tuesday, 24 November 2020

दाम्पत्याने जोशीपेठेतच वास्तव्यास असलेल्या तसेच बँकेचे व्हॅल्युअर सराफ हाताशी धरुन सोने खरे असल्या बाबतचा अहवाल आणि नकली सोने तारण ठेवून बँकेतून ८ लाख ५० हजार रुपये रोख कर्ज म्हणून लाटले.

जळगाव : जोशी पेठ येथील रहिवासी पती-पत्नीने खामगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेत चक्क नकली सेाने तारण ठेवत साडेआठ लाखांचे कर्ज उचलून बँकेला ठेंगा दाखवला आहे. बँकेने तारण सेाने लिलावाला काढल्यानंतर ते नकली असल्याचे निष्पन्न झाल्यावर शहर पोलिस ठाण्यात ललित जाधव व त्याची पत्नी आरती जाधव यांच्यासह बँकेचे सेाने परीक्षक योगेश वाणी (रा. २३६, जोशीपेठ) यांच्या विरुद्ध संगनमत करुन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवश्य वाचा- धागा धागा जोडत लावला ‘लेफ्टनंट’चा स्‍टार 
 

शहरातील दि. खामगाव अर्बन-को ऑपरेटीव्ही बँक शाखा नवीपेठ जळगाव येथे जेाशी पेठेतील रहिवासी ललित बाळकृष्ण जाधव व त्यांची पत्नी आरती ललित जाधव असे दोघे बँकेचे नियमित सभासद होते. बँकेच्या सेाने तारण कर्ज योजनेअंतर्गत ४ एप्रिल २०१७ रोजी ललित जाधव याच्या खात्यावर ४ लाख रुपये (२८५. २० ग्रॅम तारण) आणि आरतीच्या खात्यावरुन ४ लाख ५० हजार (२८५.६८० ग्रॅम) असे सेाने तारण ठेवून एकुण ८ लाख ५० हजार रुपये कर्जाची उचल केली. गेले तीन वर्षे संबंधित कर्जदारांनी कुठलीही परतफेड केली नाही. म्हणून तारण सोने लिलावाचा निर्णय घेण्यात आला होता. 

अशी केली फसवणूक 
जाधव दाम्पत्याने जोशीपेठेतच वास्तव्यास असलेल्या तसेच बँकेचे व्हॅल्युअर सराफ योगेश वाणी यांना हाताशी धरुन सोने खरे असल्या बाबतचा अहवाल आणि नकली सोने तारण ठेवून बँकेतून ८ लाख ५० हजार रुपये रोख कर्ज म्हणून लाटले. हे कर्ज ४ एप्रिल २०१८ पर्यंत फेडणे बंधनकारक असताना मुदतपुर्ण होवुनही कर्जफेड न झाल्याने कर्जदारांना बँकेने नोटीस पाठवून नंतर तारण सोने लिलावासाठी काढले. या सोन्याचे मूल्यांकन नव्या सराफाकडून केल्यावर सर्व सोने नकली असल्याचे निष्पन्न झाले. बँकेचे व्यवस्थापक गोपाळ महाले यांनी २० ऑक्टोबर रेाजी शहर पेालिसांत तक्रार दिल्यावरुन पती-पत्नीसह खोट्या सेान्याचा अहवाल देणाऱ्या योगेश वाणी यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली हेाती. 

 

पती अटकेत 
दाखल गुन्ह्यात ललित जाधव यास साहाय्यक पेालिस निरीक्षक बागुल यांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यावर पेालिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उर्वरीत संशयीत त्याची पत्नी व बँकेचा अधिकृत व्हॅल्युअर सराफ योगश वाणी या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon husband and wife cheated the bank by taking out a loan on fake gold