लोककलेने घडविले, नाटकामुळेच मिळाली 'स्टेज डेअरिंग'- पालकमंत्री पाटील 

देविदास वाणी
Monday, 9 November 2020

लोककला प्रकारात काम करणार्‍या व लोक कलेचे जतन व संवर्धन करण‍या लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

जळगाव ः मी स्वत: शालेय जीवनापासून नाटकात काम करत होतो. यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांमध्ये अनेक नाटकांमधून प्रमुख भूमिका निभावल्या. राजकारणात आवश्यक असणारी स्टेज डेअरिंग ही आपल्याला नाटकाने दिली. त्या काळात थोडा पैसा गाठीला असता तर मी आपल्यासमोर नट म्हणून आलो असतो. पण त्या नाटकातून निघून मी राजकारणाच्या नाटकात आलो. लोककलेनेच मला घडविले, नाटकामुळे मला स्टेज डेअरिंग मिळाली असल्याच्या भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. 

आवश्य वाचा- आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार जबाबदार असे चिठ्ठीत लिहून एसटी कंडक्टरने घेतला गळफास !

अखील भारतीय लोक कलावंत तमाशा परिषद, अखील भारतीय शाहीर परिषद, केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने खानदेश लोक कलावंत विचार परिषद संभाजी राजे नाट्यगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

कोरोनाच्या संकट काळात खानदेशी लोककला व लोक कलावंतांवर मोठा आघात झाला आहे. तमाशा, शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आधी लोककला प्रकारात काम करणार्‍या व लोक कलेचे जतन व संवर्धन करण‍या लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

लोक कलावंत सध्या खूप अडचणीत असल्याने त्यांना शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी मदतीचा प्रयत्न रणारच आहोत. पण, यासोबत लोक कलावंतांसाठी हक्काचे अमळनेर येथे भव्य लोक कलावंत तमाशा भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित खानदेश स्तरीय लोककलावंत परिषदेत बोलत होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon made by folk art got 'stage deering' only because of drama Guardian Minister Patil