esakal | `बंद`ला जळगावात प्रतिसाद..महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Bandh Andolan

`बंद`ला जळगावात प्रतिसाद..महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील क्रूर शेतकरी (Farmer) हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकार (BJP government) विरोधात महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh Andolan) हाक दिल्यानंतर आज जळगाव जिल्हा महाआघाडीचे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी केला. सकाळी शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. दुपारनंतर त्या सुरू झाल्या. उपनगरातील सर्वच दुकाने सुरूच होती.

हेही वाचा: धुळेः महाविकास आघाडीतर्फे नेरला रास्ता राको..


बंद आंदोलनाला काँग्रेस भवनापासून सुरूवात झाली. प्रथम फुले मार्केट, सुभाष चौक, सराफ बाजार, दाणा बाजार, गोलाणी मार्केटमध्ये आंदोलक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जावून संपूर्ण दुकाने बंद करायला सांगितले. व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव बंद ठेवले.


काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अँड रविंद्र पाटील, आमदार शिरिष चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगर अध्यक्ष शरद तायडे, एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक पाटील, योगेश देसले, रविंद्र पाटील, डी. जी. पाटील, संदिप पाटील, बाबा देशमुख, मंगला पाटील, शोभा चौधरी, योगेंद्र पाटील, जगदीश गाडे, प्रदिप सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या


आजच्या बंदबाबत सकाळपासूनच व्यापाऱ्यांना उत्सूकता होती. दुकाने सुरू करावी किंवा नाही या चिंतेत व्यापारी दुकानांबाहेर घोळक्या घोळक्यांनी बंद विषयावर चर्चा करीत होते. सकाळी दहाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बंदचे आवाहन करीत सुरू असलेली दुकाने बंद करायला लावली. अत्यावश्‍यक सेवेची दुकाने त्यातून वगळण्यात आली होती.


घोषणा अन उत्साह....
महाविकास आघाडीने एकत्र येत बंदचे आंदेालन केले. यामुळे तिनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या घोषणा दिल्या. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय काँग्रेसचा विजय असो, मुर्दाबाद मुर्दाबाद केंद्र सरकार मुर्दाबाद, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, केंद्र सरकारचे करायचे काय ? खाली डोकं वर पाय, शिवसेनेने जय भवानी जय शिवाजी, शिवसेनेचा विजय असो, आदी घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्यांमध्ये घोषणांनी उत्साह येवून ते अधिक तीव्रतेने बंदचे आवाहन करीत होते. आंदोलकाबरोबर पोलिसही होते.

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त

उपनगरात सर्व सुरळीत
शहरातील उपनगरातील पिंप्राळा, हुडको, रामानंद नगर, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, महाबळ कॉलनी, खेडी, अजिंठा चौफुली आदी परिसरातील दुकाने नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती.

loading image
go to top