esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे-रक्षा खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

MP Raksha Khadse

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे-रक्षा खडसे

sakal_logo
By
कैलास शिंदे


जळगावः शेती नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना (Farmers) सरसकट हेकटरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दयावी असे मत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री नसताना औरंगाबाद येथे व्यक्त केले होते,आता मुख्यमंत्री असताना त्यानी हा शब्द पाळावा मात्र ते शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही असा आरोप भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांनी केला आहे. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा बैठक आटोपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

हेही वाचा: Jalgaon:पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे जम्मू काश्मीर येथे शहिद

या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री ज्या प्रमाणे शेतकऱ्यांशी बोलले त्या प्रमाणे मात्र ते वागत नाहीत.राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मात्र ते आता सरसकट नुकसान भरपाई देत नाहीत.पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल असे आता सांगत आहेत. आता त्यानी आपण दिलेला शब्द पाळून नुकसान भरपाई दयावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा: Dhule: साक्रीत महाविकास आघाडीचा फायदा तर भाजपचे नुकसान


राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत त्या म्हणाल्या शेतकऱ्यांचे वीज हे सरकार कट करीत आहे.थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कट करू नये या बाबतीत आपण स्वतः: मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,कृषिमंत्री दादा भुसे याना पत्र लिहिले एक नव्हे तर तब्बल पंचवीस पत्रे दिली परंतु त्याची ते दखल घेत नाहीत असा आरोपही खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी केला.

loading image
go to top