जळगाव महापालिका कोरोनाची लस खरेदी करणार !

, मुंबई, पुणे, नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात येत आहे.
जळगाव महापालिका कोरोनाची लस खरेदी करणार !

जळगाव : मुंबई (Mumbai) , पुणे (pune) आणि नाशिक (Nashik) महापालिकाप्रमाणे जळगाव महापालिका (Jalgaon Municipal Corporation) लस खरेदी करण्यासाठी (corona vaccine) प्रयत्नशील आहे. त्यासाठी पुणे, नाशिक महापालिकेकडून प्रशासकीय पातळीवर (administrative level) माहिती मागविण्यात येत आहे, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

(jalgaon municipal corporation corona vaccine make purchase)

जळगाव महापालिका कोरोनाची लस खरेदी करणार !
जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची मागणी निम्म्यावर


कोरोना आटोक्यात आणण्यासाठी वेगाने लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, लशीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक महापालिकेने लस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत ठराव मंजूर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने लस खरेदी करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. याबाबत माहिती देताना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की लस खरेदी करण्यासाठी जळगाव महापालिका सकारात्मक आहे. प्रशासकीय पातळीवर माहिती मागविण्यात येत असून, मुंबई, पुणे, नाशिक महापालिकेकडून माहिती मागविण्यात येत आहे. त्यांच्याकडून माहिती आल्यानंतर विशेष महासभा घेऊन ठराव करण्यात येईल व नागरिकांसाठी लस खरेदी करून उपलब्ध करण्यात येईल.

जळगाव महापालिका कोरोनाची लस खरेदी करणार !
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात

दिड लाख लस खरेदीचे करावे लागणार नियोजन

जळगाव शहराची लोकसंख्या साधारण पाच लाख आहे, शहरातील दीड लाख लोकांना लस देण्यासाठी महापालिकेने लस खरेदी करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती, यासाठी त्यांनी आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. जळगाव शहरात आतापर्यंत ७५ हजार ९५० जणांनी लस घेतली आहे. त्यात ५७ हजार १३४ लोकांनी पहिला डोस, तर १८ हजार ८१६ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com