esakal | आतातरी कोविड रुग्णांच्या बाबतीत स्टंटबाजी थांबवा : संजय गरुड

बोलून बातमी शोधा

girish mahajan sanjay garud
आतातरी कोविड रुग्णांच्या बाबतीत स्टंटबाजी थांबवा : संजय गरुड
sakal_logo
By
टिम इ सकाळ

शेंदुर्णी (जळगाव) : जामनेर मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबई- नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचा आव आणत असताना पेशंटच्या नातेवाइकांना समोर स्टंटबाजी करणे आता तरी सोडा. असा टोल जामनेर तालुक्‍यातील राष्‍ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे.

दवाखान्यात स्टंटबाजी करत असताना कार्यकर्ते व रुग्णालयाची यंत्रणेसोबत घेऊन फिरतात. प्रोटोकॉलमुळे यंत्रणा वेठीस धरली जाते. त्यामुळे तेवढ्या वेळेत रुग्णांकडे दुर्लक्ष होते. सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवून, मोठा ताफा सोबत घेऊन हॉस्पिटल मधील आपली स्टंटबाजी एका सामान्य व सुज्ञ महिलेला सुद्धा कळते. त्या महिलेने फार योग्य सल्ला दिलेला आहे. त्या भगिनीचे स्वागत करत असून, तिने सुनावलेले खडेबोल एक सुज्ञ आमदार म्हणून आचरणात आणावे व महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचे राजकारण न करता रुग्ण सेवा करावी असे आवाहन देखील गरूड यांनी केले आहे.

आमदार निधी तालुक्‍यासाठी खर्च करा

बाहेरील दौऱ्यांवर आमदार निधी खर्च करण्यापेक्षा जामनेर तालुक्यातील आरोग्य सेवेवर आपला आमदार निधी खर्च करून मतदारसंघातच रुग्णसेवा करा. आता तरी या महिलेने दिलेल्या प्रसादाचा आपणास जामनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी सद़् विवेक बुध्दी मिळण्याचा लाभ मिळो ही तालुक्याची अपेक्षा; अशी प्रतिक्रिया देखील संजय गरूड व्यक्‍त केली.