esakal | पत्नी’ कोरोनामुक्त आणि त्याने केली तिची ‘आरती’ !

बोलून बातमी शोधा

पत्नी’ कोरोनामुक्त आणि त्याने केली तिची ‘आरती’ !
पत्नी’ कोरोनामुक्त आणि त्याने केली तिची ‘आरती’ !
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोना झाल्याचे कळताच प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. आता काही खरे नाही याची धास्ती असते. त्यातल्या त्यात पत्नीला कोरेाना झाल्याचे म्हटल्यावर पतीसह मुलेही अर्धमेली होतात. मात्र मनावर ताबा ठेवत येथील नटेश्‍वर डान्स क्लबचे संचालक, पत्रकार नरेश बागडे यांनी पत्नीला-राधीका बागडे कोविड केअरला दाखल केले. तिच्यावर वेळेवर उपचार केले. ती कोरोनामुक्त होवून घरी आल्यानंतर आज त्याने पत्नीची चक्क आरती करून स्वागत केले.

हेही वाचा: हजारो रुपये किलोने बियाण्यांची खरेदी,आणि भाव मात्र ४ ते ५ रुपये किलो !

गेल्या १२ एप्रिलपासून नरेशची पत्ती राधिका बागडे हिला कोरोनाची लागण झाली. दोघांच्या मनात धडकी भरली की आता कसे होईल, काय होईल? पण कोरोनाचा संकटाचा सामना करत असतानाच त्याने इकरा कोविड केअर सेंटरमध्ये तिला दाखल केले. १५ एप्रिलला ऑक्सीजनवर ठेवले.नंतर तिची तब्येत बरी झाली. आज तिचा अहवाल निगेटीव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाली. ती घरी येताच नरेशने तिचे आरती ओवाळून स्वागत केले. एरवी पतीचे, मुलाचे औक्षण पत्नी करते. मात्र आज पत्नी मोठ्या संकटातून बरी हेावून घरी परतल्याचा नरेशच्या आनंदाला पारावार नव्हता.

हेही वाचा: कोणी..ऑक्सिजन सिलिंडर देत का ?

राधीका रुग्णालयात असताना नरेश तिला जेवणाचा डबा देण्यास, औषधी देण्यास जात होता.त्याला कोरोनाची बाधा झाली. मात्र लक्षणे अधिक नसल्याने डॉक्टरांनी त्याला घरीच औषधोपचार घेण्यास सांगीतला. त्यातून तोही आता बरा झाला आहे. यात सचिन लढढा, अविनाश दुसाने, विजय बागडे, विश्‍वजीत चौधरी, निलेश जोशी, डॉ.प्रशांत मंत्री, डॉ.महेंद्र पाटील, इकरा यूनानीचे डॉ. राजेश जैन, डॉ.नरेंद्र पाटील यांनी मोलाच सहकार्य केले.

संपादन- भूषण श्रीखंडे