esakal | हजारो रुपये किलोने बियाण्यांची खरेदी,आणि भाव मात्र ४ ते ५ रुपये किलो !

बोलून बातमी शोधा

onian
हजारो रुपये किलोने बियाण्यांची खरेदी,आणि भाव मात्र ४ ते ५ रुपये किलो !
sakal_logo
By
धनराज माळी

वैंदाणे : कांदा लागवडीसाठी महागडे बियाणे शेतकऱ्यांनी बाहेरील जिल्ह्यातून आणले होते. काही शेतकऱ्यांनी तर गुजरात व मध्य प्रदेश मधूनही हजारो रुपये खर्च करून बी आणले. त्यातही बऱ्याच प्रमाणात बी खराब निघाले तरीही हार न मानता आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र कांद्याचे भाव अगदी कवडीमोल झाल्यामुळे लागवड खर्च तर सोडाच पण बी खरेदीचा खर्चही निघत नसून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

हेही वाचा: कोणी..ऑक्सिजन सिलिंडर देत का ?

३ ते ४ महिने कांदा पिकला पाणी, खत देऊन निंदनी करण्यापर्यंतचा खर्च त्यानंतर कांदा तयार झाल्यावर त्याची काढणी, आणि वाहतूक खर्चाचा हिशोब पाहता शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. कापसाचे बोंड सडून गेली होती हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाला पसंती दिली होती. मात्र कांद्याच्या पिकाने ही वांदा केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

हेही वाचा: एमआयडीसीतील जागेसह ‘ऑक्सिजन’साठी ८० लाख

साठवणुकीवर भर

ज्या शेतकऱ्यांनकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी तात्पुरती व्यवस्था करून तर काहींनी भाडेतत्त्वावर कांदाचाळ घेतली असून त्यात कांदे साठवणूक करत आहेत तर दुसरीकडे गावात व्यापारी ३ ते ४ रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करत आहेत. जे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. मात्र लॉकडाउन असल्याने भाव कधी वाढतील याची ही खत्री नाही शिवाय तात्पुरत्या स्वरूपात साठवून करून ही कांदा सळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी ३ ते ४ रुपये प्रमाणे का असेना पण आहे त्या भावत विक्री केली.

हेही वाचा: केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !

कांदे विक्रीसाठी मी अहमदाबादला घेऊन गेलो होतो. मला ६ रुपयांचा भाव मिळाला. गाडी भाडे, मजुरी, कांद्याचे कट्टे याचा हिशोब करता पदरी निराशा आली. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्नच आहे.

- सतिष बच्छाव (कांदा उत्पादक शेतकरी, वैंदाणे)

संपादन- भूषण श्रीखंडे