
शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत.
जळगाव : कोरोना संसर्गाचा सामना करीत जिल्हा प्रशासनाने मंगळवार (ता. ८)पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे सुरू आहेत. असे असले तरी पालकांनी संमती दिली, तरच पाल्यांना शालेत जाता येणार आहे.
वाचा- आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने -
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या दोन लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ ५२ हजार पालकांनी संमतीपत्र दिले असून, तब्बल दीड लाख पालकांनी नकार दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८५६ शाळांपैकी १८८ शाळांनीही शाळा सुरू करण्यास सहमती दर्शविलेली नाही, हे विशेष!
जिल्ह्यात मंगळवारपासून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांना तयारी करण्यास सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आतापर्यंत ८५६ पैकी ७५० शाळांची तपासणी झाली आहे.
आवश्य वाचा- आशांकडून बेकायदेशीर पैश्यांची मागणी; ऑडीयो क्लिप व्हायरल -
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी भडगाव येथील सौ. सु. गी पाटील माध्यमिक विद्यालयास भेट देत तयारीचा आढावा घेतला. सौ. ज. ग. पूर्णपत्री कनिष्ठ महाविद्यालयात केंद्रप्रमुख रवींद्र सोनवणे, एस. बी. शिंदे यांच्यासह भेट दिली. या भेटीत शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेने केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली व शाळा सुरू करण्यास संमती देण्यात आली. उपमुख्याध्यापक के. एस. पाटील, उपप्रचार्या राय, पर्यवेक्षक अरुण पाटील, एस. एम. पाटील, मुख्य लिपिक देवरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे