रेल्वेत पार्सल टाकायच आहे; तर आता  १२० दिवसअगोदर बुकींग करावी लागणार  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेत पार्सल टाकायच आहे; तर आता  १२० दिवसअगोदर बुकींग करावी लागणार 

व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा. रेल्वेद्वारे पार्सल बुकिंग करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे.

रेल्वेत पार्सल टाकायच आहे; तर आता  १२० दिवसअगोदर बुकींग करावी लागणार 

जळगाव/भुसावळ ः रेल्वे प्रशासनातर्फे व्यापारी, व्यावसायिकांच्या सुविधेसाठी विशेष गाडी तथा विशेष पार्सल गाडीचे एसएलआर, पार्सल यानमध्ये १२० दिवस अग्रीममध्ये पार्सलची जागा आरक्षित करण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. 
या योजनेंतर्गत व्यापारी पार्सल पाठविण्यासाठी १२० अधिस्थान आरक्षित करू शकतात. 

आवश्य वाचा- ‘रास्ता रोको’ करतांना  ४४ जणांनी मास्क लावले नाही; पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

विशेष पार्सल गाडीत एसएलआर, पार्सल यानमध्ये भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलसाठी स्थान आरक्षित करता येणार आहे. बाकी ९० टक्के पार्सल भाडे गाडीच्या निर्धारित सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. ग्राहक गाडीच्या निर्धारित सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही, तर पार्सलची अग्रीम बुकिंग रद्द करण्यात येईल आणि भरलेले अग्रीम पार्सल भाडे १० टक्के जप्त केले जाईल. याच प्रकारे विशेष पार्सल गाडीत मागणीनुसार बुकिंगही १२० दिवसअगोदर करता येणार आहे. यासाठी वॅगन्स पंजीकरण शुल्क भरावे लागणार आहे. 

वाचा- अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू;संतप्त शेतकऱयांनी दिला इशारा !

७२ तासांपूर्वी रद्द करता येईल बुकिंग 
पार्सलसाठी आरक्षित केलेली जागा रद्द करावयाची असेल, तर गाडी सुटण्याच्या ७२ तास आधी रद्द करता येईल. अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम परत मिळेल; परंतु ७२ तासांनंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनातर्फे गाडी रद्द करण्यात आली, तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल. व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा. रेल्वेद्वारे पार्सल बुकिंग करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानासाठी जागा सुरक्षित करावी, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Web Title: Marathi News Jalgaon Parcel Booking Has Be Done Train One Hundred And Twenty Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top