esakal | मृत्युसत्र कायम; जळगाव जिल्ह्यात पुन्हा २३ बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मृत्युसत्र कायम; जळगाव जिल्ह्यात पुन्हा २३ बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग स्थिर असला, तरी मृत्युसत्र सुरूच आहे. मंगळवारीही जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू झाला. पैकी पाच जण जळगाव शहरातील आहेत. नव्या एक हजार १२ रुग्णांची भर पडून दिवसभरात ९९५ रुग्ण बरे होऊन घरीही गेले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ९ लाख संशयितांची झाली कोरोना चाचणी

जळगाव जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास असून, ती फारशी वाढलेली नाही. तर तेवढेच रुग्ण बरेही होत आहेत. मंगळवारी प्राप्त आठ हजार १२३ अहवालांपैकी एक हजार १२ रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख १८ हजार ९२८ वर पोचली आहे, तर ९९५ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही एक लाख पाच हजार ९०१ झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा २३ जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा दोन हजार १२२ वर पोचला आहे. सारी, नॉन कोविड, न्यूमोनिया, पोस्ट कोविडचा त्रास या कारणांमुळे १६ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: संपर्कातील ‘हाय रिस्क’ व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घ्या!

असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात नवे १६३ रुग्ण आढळले आणि दिवसभरात २२० रुग्ण बरे झाले. त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरातील सक्रिय रुग्णसंख्या एक हजार ८८८ पर्यंत खाली आली आहे. अन्य ठिकाणचे रुग्ण असे : जळगाव ग्रामीण ५६, भुसावळ ४९, अमळनेर ४६, चोपडा ५३, पाचोरा ५९, भडगाव ३३, धरणगाव २७, यावल २६, एरंडोल १००, जामनेर ५९, रावेर ९६, पारोळा ३७, चाळीसगाव ६४, मुक्ताईनगर १७, बोदवड १२०, अन्य जिल्ह्यांतील ७.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top