esakal | लॉकडाउन झुगारून विदेशी सिगारेटची तस्करी !

बोलून बातमी शोधा

crime

लॉकडाउन झुगारून विदेशी सिगारेटची तस्करी !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील चोपडा मार्केटमधील भारद्वाज ट्रेडर्सच्या गुदामात बेकायदेशीर विदेशी बनावटीच्या व कालबाह्य सिगारेटची तस्करी करणाऱ्या सहा संशयितांवर कारवाई करत ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या पथकाला गस्तीदरम्यान एक्सपायर सिगारेटचा माल आढळून आला. याबाबत जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: मनपा ‘ॲक्शन मोड’वर; हॉटस्पॉट, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये टेस्टिंग

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता भजे गल्लीमार्गे जात असताना, नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे भारद्वाज ट्रेडर्स नावाच्या दुकानाशेजारील गुदामाबाहेर माल काढून नेण्याच्या तयारीत असलेल्यांना हटकले. निरीक्षक विलास शेंडे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, मनोज पवार, महेंद्र बागूल, प्रशांत पाठक, विकास पहूरकर, विनोद पाटील यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांचे जामावबंदी आणि संचारबंदीचे उल्लंघन करताना आढळून आलेल्या नरेंद्र पाटील (वय ३२, रा. आव्हाणे), एकनाथ पाटील (२४, आव्हाणे), ललित पांडे (४५, गांधीनगर, जिल्‍हापेठ), जयवंत बाविस्कर (चांदसर, ता. धरणगाव), प्रेमसिंग पाटील (२६, दादावाडी जैन मंदिरामागे) यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यातील विदेशी बनावटीचा आणि एक्सपायर झालेला सिगारेटचा माल आढळून आला. अरुण पुंडलिक पाटील यांच्या सिगारेट असल्याचे संशयितांनी चौकशीत सांगितले. याबाबत पोलिस कर्मचारी मनोज पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा संशयितांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

विदेशी सिगारेटचा माल असा

- दहा हजार २०० रुपयांचे ५१ बॉक्स गोल्डफ्लॅक सिगारेट

- सहा हजार २०० रुपयांचे ३१ बॉक्स वुडनगरम

- १२ हजार ५०० रुपयांचे २५ बॉक्स सिल्व्हर वुडनगरम

- ९०० रुपयांचे तीन बॉक्स ब्लॅक सिगारेट

संपादन- भूषण श्रीखंडे