‘बीएचआर’च्या ठेवीदारांना हार्डशिप मधून दिलासा 

‘बीएचआर’च्या ठेवीदारांना हार्डशिप मधून दिलासा 

जळगाव ः राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या येथील राज्यातील २६४ शाखा असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे अवसायनात आलेल्या या संस्थेच्या कर्जवसुलीतून व मालमत्ता विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांना हार्डशिप प्रकरणे स्वीकारून ठेवींचा परतावा दिला जात असल्याची माहिती ठेवीदारांच्या राज्यस्तरीय व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या बैठकीत देण्यात आली. 

जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणित ठेवीदार समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत कोरोना परिस्थितीमुळे कर्जवसुली ठप्प झाल्याने ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमेचा परतावा होण्यास अडचणी येत आहेत. यावर शासनाने बीएचआर मल्टीस्टेट संस्थेच्या कर्जदारांकडून वसुलीची व त्यासाठी योग्य त्या कारवाईची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी निवेदने आपल्या भागातील खासदारांना ठेवीदारांनी द्यावेत असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

२ लाखांपुढील गुंतवणूकदारांना आवाहन 
जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे संस्थेच्या तत्कालीन संचालकांवर राज्यातील ५९ ठिकाणी एमपीआयडी कायद्याने गुन्हे दाखल झाल्याने संचालकांना अटक होऊन संस्थेच्या मालमत्ता विक्री व कर्जवसुलीतून गुन्हे दाखल केलेल्या व सहतक्रारदार ठेवीदारांना मुदतीत ठेव रक्कम परत देणे अधिनियमानुसार बंधनकारक असल्याने संघटनेकडून "हार्डशिप" प्रकरणे तयार करून ठेवीदारांना परतावा दिला जात आहे. 

संघटनेचे सभासद असलेल्या दोन लाखाच्या पुढील गुंतवणूकदारांनी ठेव रक्कम परत मिळावी म्हणून आपापले मूळ पावत्यांसह हार्डशिप प्रकरण दाखल करावे किंवा अधिक माहितीसाठी 7620093937 या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन बैठकीवेळी संघटनेचे संस्थापक ठाकरे यांनी केले. 

बैठकीत राज्यभरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला व इतर ठिकाणचे ठेवीदार सहभागी झाले होते. पुणे विभाग समन्वयक रविंद्र पावटेकर, वनराज महाडीक, विद्या रायसोनी, विष्णू करपे, विष्णू ताकाटे, विवेक बुटाला, सुहास जांगडा, विवेक खुने, युवराज क्षीरसागर, अनिकेत तिरपनकर, रघुनाथ नेवासकर, सतिश भोंडे, सतिश गांधी, शैला कडाळे, श्रीकांत दिवटे, सुधीर जाधव, प्रा.प्रकाश लोहार, रामदास मोकाशी, संदीप पाटील, संगिता बुधवंत, नागनाथ जोंजाळ, नामदेव माने, अनिल चव्हाण, अनिल शिंगाडे, प्रसाद गावडे, खंडू कोकणे, अनिल पागडे, अजय चौधरी, अक्षय ठाकरे, आनंद वाघमारे, ज्ञानेश्वर भोसले आदी ठेवीदारांनी सहभाग नोंदवला. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com