esakal | जिल्ह्यातील ही मोठी धरणं होताय फुल्‍लं; गावांना सतर्कतेचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

hatnur dam

हवामान खात्याने जिल्ह्यात मध्यम, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव, भुसावळ, जामनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना दक्षता घेण्याविषयी सूचना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील ही मोठी धरणं होताय फुल्‍लं; गावांना सतर्कतेचा इशारा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी वाघूर धरण शंभर टक्के भरले असून, गिरणा धरण ९४ टक्के तर हतनूर धरण ७४ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. परिणामी गिरणा, वाघूर, तापी नद्यांना पूर येण्याचा धोका असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात चांगला पाणीसाठा असल्याने आगामी रब्बी व उन्हाळी हंगामासाठीही पिकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. 

अवश्‍य पहा - अजबच...पितृपक्ष आणि शासन निर्णयाचे वर्षश्राद्ध; काय होता निर्णय वाचा
 

वाघूर धरण १०० टक्के भरले असून, त्यात पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाघूर नदीला यामुळे पूर आला आहे. त्यात हवामान खात्याने जिल्ह्यात मध्यम, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव, भुसावळ, जामनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना दक्षता घेण्याविषयी सूचना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहे.

नक्‍की वाचा- जळगावहून आता वापी अन्‌ अंकलेश्‍वर; नाशिक, मुंबईसाठीचेही असे आहे नवे शेड्युल्‍ड
 

या संदर्भात भुसावळ व जळगाव प्रांताधिकारी, जळगाव, भुसावळ व जामनेर येथील तहसीलदारांना पत्र दिले आहे. गिरणा धरणाचे दरवाजे उघडल्यास गिरणा नदीला केव्हाही पूर येऊ शकेल, यामुळे गिरणा नदी काठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.