खांदेकरी बनून मूलींनीच दिला आईच्या पार्थिवाला अग्नीडाग

खांदेकरी बनून मूलींनीच दिला आईच्या पार्थिवाला अग्नीडाग
Updated on

पहूर : कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून पूढील उपचार घेत असलेल्या वृद्ध आईची प्राणज्योत मालवल्यानंतर तिघं बहिणी आईच्या खांदेकरी बनल्या अन जड अंतकरणाने त्यांनी अग्नीडागही दिला. ही हृदयद्रावक घटना आहे पहूरपेठ येथील जोशी कुटुंबातील. मुलांची जागा मूलींनी घेत त्यांनी आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थितांची मने हेलावून गेली.

पहूर येथील आर .टी.लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुहासिनी वसंतराव जोशी यांना मागील पंधरवड्यात कोरोनाची लागण झाली होती. जळगांव येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. रुग्णालयातच पुढील उपचार सुरू असताना मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि काल त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पहूर पेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अपर्णा जोशी, प्रज्ञा जोशी आणि नमिता जोशी या तिघी मुली त्यांच्या खांदेकरी बनून त्यांनी अग्नीडाग दिला. या पूर्वीही वडिल वसंत पंढरीनाथ जोशी यांच्या मृत्यू प्रसंगी त्यांनी वडिलांना अग्नी दिला होता. 

जोशी कुटूंबाचा नवा आदर्श

मूलींनाच मुलांप्रमाणे मानून त्यांना शिक्षण देत जोशी कुटुंबीयांनी नवा आदर्श निर्माण केला. ज्येष्ठ कन्या अपर्णा जोशी या मुंबईत चेंबुर गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. द्वितीय कन्या प्रज्ञा जोशी या सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिक्षण निरिक्षक पदी धुरा सांभाळत असून तृतीय कन्या अॅड.नमिता जोशी या पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच पाहीजे हा बुरसटलेला विचार दूर करून समाजाने मुलींना जन्म घेण्याचा हक्क देऊन त्यांना योग्य शिक्षण दिले तर मुली या नक्कीच मुलांपेक्षा एक पाऊल पुढेच राहतात , याचीच अनुभूती या प्रसंगी उपस्थितांना आली.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com