
तिच्यावर नवीन झूल चढवून नवी साडी नेसवल्यासारखा गायीला साज दिला. गोडधोड खायला दिले. गोमातेचे पूजन केले.
चोपडा : आजही समाजात भूतदया जागृत आहे. प्रत्येक जण 'जगा आणि जगू द्या' या मंत्रानुसार आपल्या आयुष्यात जगत असतोच. पण काही मंडळी त्याही पुढे जावून जगण्याचा प्रयास करते. त्याचाच एक प्रत्यय चोपडा शहरात पाहावयास मिळाला. चक्क गोमातेचे विधिवत डोहाळे जेवण करण्याचा उपक्रम करण्यात आला.
आवश्य वाचा- खानदेशात प्रथमच फोस्टनन मांजऱ्या सापाची नोंद !
भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्ष कविता वाणी व त्यांच्या परिसरातील महिलांनी गोमातेच्या पहिल्या गर्भधारणेनंतर चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या माळी वाड्यात पार पडला. सौ. वाणी या भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्ष असल्या सोबतच प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी देखील आहे. शेतीत त्यांनी विविध धाडसी प्रयोग केल्याने व शेती निगडीत उद्योग निर्माण केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
असा झाला कार्यक्रम..
त्यांनी आपल्या वडती (ता. चोपडा) येथे पाळलेल्या गायींपैकी प्रथमच गर्भधारणा प्राप्त केलेल्या गायीला घरी आणले. तिच्यावर नवीन झूल चढवून नवी साडी नेसवल्यासारखा गायीला साज दिला. गोडधोड खायला दिले. गोमातेचे पूजन केले. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात गायिली जातात, ती पारंपारिक गीतेही गायली. हा सगळाच प्रकार पाहून हरकून गेली असावी.
आवर्जून वाचा- अजब सिंचन विभागाची गजब कहाणी; चौकशीसाठी नेमले त्यालाच ठरविले दोषी अन् साक्षीदार
आणि गावात चर्चा
गोमातेच्या या डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमाची शहरात जोरदार चर्चा होत आहे. गोमातेच्या या डोहाळे जेवणाच्या उपक्रमात दीपश्री मेने, सोनाली वाणी, शीतल माळी, मंजूषा अडगावकर, जयश्री भदाणे, रत्ना मेने, आर्यमा वाणी, समनेरकर बाई, गोडमबाई माळी, विद्या बारी उपस्थित होत्या.
संपादन- भूषण श्रीखंडे