मोठा आवाज झाला...आणि शेजारचे बालंबाल बचावले !

मोठा आवाज झाला...आणि शेजारचे बालंबाल बचावले !

पहूर (ता . जामनेर) : पहूर पेठत जून्या ईमारती मोठ्या प्रमाणात असून त्या जीर्ण अवस्थेत आहे. त्या ईमारती कोसळण्याच्या दाट शक्यता असून त्यातच सोमवारी पहाटे एक इमारत अचानक कोसळली.  या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहाणी झाली नसली तरी शेजारील रहीवाशी मात्र बालंबाल बचावले आहेत.

पहूर येथे आज पहाटे पाऊस सुरु होता सकाळी सात वाजे दरम्यान श्रीकृष्ण मंदिराजवळ सुमारे १०० वर्षांची जीर्ण दुमजली इमारत ७ वाजेच्या सुमारास कोसळली. सदर इमारतीत गेल्या ८ ते १० वर्षांपासून कोणीही वास्तव्यास नव्हते . पूर्वी या इमारतीत किराणा दुकान होते परंतू इमारत जास्त जीर्ण झाल्याने आता मात्र या इमारतीत कोणाचा रहिवास नव्हता. त्यामुळे आज झालेल्या घटनेत सुदैवाने प्राणहाणी टळली.  

मोठा आवाज होताच….
सकाळ पासून सुरू असलेला पाऊस त्यात सात वाजता इमारत कोसळताच मोठा आवाज झाला. आजू-बाजूचे लोक काही क्षणासाठी भांबावले परंतू त्यानंतर इमारत कोसळल्याचे समजताच तेथे धावून आले. इमारतीचा सर्व मलबा हा खाली कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नाही. परंतू इमारतीच्या शेजारील रहिवाशी मात्र बालंबाल बचावले आहेत.  तर कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच राहणाऱ्या शांताराम गोंधनखेडे यांच्या घरावर इमारतीचा काही भाग कोसळला.

तक्रार करून ही दखल घेतली नाही  
कोसळल्या इमारतीच्या शेजारी रहनारे शांताराम गोंधनखेडे यांनी इमारतीच्या मालकास तसेच ग्रामपंचायतीला वेळोवेळी सदर जीर्ण इमारत पडून अपघात होवू शकतो, या विषयी माहीती व तक्रार केली होती. मात्र संबंधितांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. पहूर पेठ गावांत अजून अशा काही धोकेदायक जीर्ण इमारती आहेत. प्रशासनाने अशा जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची मागणी शांताराम गोंधनखेडे, सुनिता गोंधनखेडे, सुनंदा खोबरे, सुभद्रा खोबरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com