शाळा नव्हे; ही तर घराची गच्ची, अशी ही दिव्यांग शिक्षीकाची युक्ती ! 

शाळा नव्हे; ही तर घराची गच्ची, अशी ही दिव्यांग शिक्षीकाची युक्ती ! 

पहूर (ता. जामनेर)  ः पहूर-कसबे येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील उपक्रमशील दिव्यांग शिक्षिका श्रीमती कीर्ती बाबूराव घोंगडे यांनी कोरोनाच्या काळात ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत त्यांनी घराच्या गच्चीवरच शाळा भरविली आहे. 

कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद असल्याने त्यांनी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा ग्रुप तयार केला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे दिनकर पाटील संचालक यांचा शाळा बंद... पण शिक्षण चालू अभ्यासमाला , शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी पाठवलेले ऑडिओ क्लिप We Learn English,नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी तसेच ऑनलाइन आकर्षक शैक्षणिक फ्लिपबुक स्वतः तयार करून विद्यार्थ्यांना ग्रुप मार्फत अध्ययन करण्याची संधी दिली उपलब्ध करून दिली. एकीकडे डायटतर्फे आयोजित करण्यात आलेला प्रश्न निर्मिती ग्रुपवर DICPD चे प्रा .शैलेश पाटील यांनी दिलेल्या संधी नुसार जळगाव जिल्ह्यात गुगल फॉर्मद्वारे प्रश्ननिर्मिती केली. 

ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करीत असताना असे लक्षात आले की , फक्त 20 % विद्यार्थी या पद्धतीचा अवलंब करत आहेत .म्हणून राहिलेल्या 80 % विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने "वर्क फ्रॉम होम" हा मार्ग निवडला गावाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी बोलवून अध्यापन करून स्वयं अध्ययन कसे करावे ?याविषयी मार्गदर्शन केले . स्वतः झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेतला. कमी बुद्ध्यांक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून गणित व मराठी विषयाच्या पेटीतील साहित्य पालकांना देऊनआपल्या मुलाचा अभ्यास कसा घ्यायचा ? याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास ग्रुप मार्फत किंवा स्वतः विद्यार्थ्यांना घरी नोट्स मागवून त्याची तपासणी करून करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. 

ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांचा कौशल्यात्मक विकास घडवण्यासाठी चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, कार्यानुभव वस्तूंचे सादरीकरण केले. विद्यार्थिनींनी देखील यात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. 
जळगांव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती डॉ.मंजुषा क्षिरसागर , गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे ,शिक्षण विस्ताराधिकारी अधिकारी विष्णू काळे, केंद्रप्रमुख भानुदास तायडे, मुख्याध्यापक सूनिल कोळी ,शिक्षक वृंद यांनी श्रीमती कीर्ती घोंगडे यांचे कौतुक केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com