esakal | गॅस सिलेंडर वाटणीच्या वादातून पुतण्याने काकांचा केला खून 
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस सिलेंडर वाटणीच्या वादातून पुतण्याने काकांचा केला खून 

खिशातील कांदा कापण्याच्या चाकूने काकांच्या पोटावर वार केला. खासगी रुग्णालयात उत्तम पाटील यांना उपचार घेत असतांना बुधारी रात्री त्यांच्या मृत्यू झाला.

गॅस सिलेंडर वाटणीच्या वादातून पुतण्याने काकांचा केला खून 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : करमाड खु ता,पारोळा येथील वाटणीच्या वादातून काका-पुतण्याचे भांडण झाल्याने संतप्त पुतण्याने काकाच्या पोटात चाकू खुपसला होता त्या काकांचा बुधवारी रात्री 7 वाजता खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला. याबाबत पोलिसात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

आवश्य वाचा- खडसेंपुढे पक्षाची मोट, जिल्ह्याच्या पालकत्त्वाचे दुहेरी आव्हान ! 

पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथील रहिवासी असलेले उत्तम चिंतामण पाटील( ह मु मोहाडी सुरत बायपास जवळ ता.जिल्हा धुळे) हे धुळे येथील एमआयडीत कामाला होते त्यांच्या वडिलोपार्जित जमीन व घरातील वस्तूंची वाटणी झाली होती. त्यातील त्यांच्या हिस्यातील गॅस सिलेंडर हे त्यांचा पुतण्या सोपान तुकाराम पाटील (वय १९) हा आपल्या हॉटेल व्यवसायात वापरत होता. ते मागण्यासाठी काका उत्तम पाटील यांनी फोन केला असता त्याने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर  24 रोजी गावी करमाड खु येथे रेशन घेण्यासाठी उत्तम पाटील गेले होते. त्यांचे बंधू रमेश पाटील यांच्याकडे गप्पा मारत असताना त्यावेळी पुतण्या सोपान पाटील येवून शिवीगाळ करत वाटणीचा हिशोब मागीतला.

कांदा कापण्याची सुरीने केला वार

या शाब्दीक झालेल्या वादात सोपान पाटीलने खिशातील कांदा कापण्याच्या चाकूने काकांच्या पोटावर वार केले होते. खासगी रुग्णालयात उत्तम पाटील यांना उपचार घेत असतांना बुधारी रात्री त्यांच्या मृत्यू झाला. मारेकरी सोपान पाटीलला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

संपादन- भूषण श्रीखंडे