नाथाभाऊंच्या प्रवेशाची गणिते राज्यपालांच्या भूमिकेवरच ! 

संजय पाटील
Tuesday, 6 October 2020

शरद पवार यांनी खडसे संदर्भात बैठक घेतली होती. यावेळी काही पदाधिकाऱयांनी खडसे विषयी नकारात्मक भुमीका घेतली होती.

पारोळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या इन्कमिंग सुरू आहे; परंतु नाथाभाऊंच्या प्रवेशाची गणिते राज्यपालांच्या भूमिकेवरच अवलंबून असल्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी स्पष्ट केले. 

आवश्य वाचा- जळगाव महापालिकेत शंभर कोटी आणणारे गेले कुठे ? 
 

पारोळा एका कोविड सेंटरच्या उद्‍घाटनप्रसंगी आपल्या नेहमीच्या शैलीत डॉ. पाटील यांनी सध्याच्या राजकीय हालचालींवर भाष्य केले. या कार्यक्रमाला खासदार उन्मेष पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच पारोळ्यातील ट्रॉमा केअर सेंटर अद्ययावत करण्यासाठी पाठपुराव्याची गरज असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष करण पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार, बालाजी विद्या प्रबोधनी संस्थापक यू. एच. करोडपती, माजी पंचायत समिती सभापती डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते. 
 

पून्हा खडसेंचा प्रवेशावर उधाण

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱयांची अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे प्रवेशाबाबत बैठक घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱयांनी खडसे विषयी नकारात्मक भुमीका तर काहींनी खडसे आल्यास संघटन मजबूत होईल अशी भूमीका घेतली होती. परंतू आता पून्हा खडसेचा राष्ट्रवादीत प्रवेश या चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादीचे नेते भाषणातून खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत देत आहे.  

वाचा- रस्तालूट झाल्याचा बनाव बँक कर्मचाऱ्याच्या अंगलट 
 

 कार्यकर्ते देखील वेट अॅण्ड वाॅच

एकनाथराव खडसे यांची कार्यकर्त्याशी संवादाची आॅडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर खडसेंनी यावर भाष्य करणे टाळले होते. भाजपच्या नेत्यांनी तातडीने आॅनलाईन बैठकीतून खडसेंशी संवाद साधून चर्चा केली. त्यामुळे खडसे समर्थक देखील खडसे प्रमाणे आता वेट अॅण्ड वाॅच करत त आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola NCP leader said that Khadse's entry depended on the governor's arithmetic