esakal | जिप सदस्यांचा प्रयत्नांतून सामुहिक पाणीपुरवठा योजनेचा अडसर दुर
sakal

बोलून बातमी शोधा

Water

जिप सदस्यांचा प्रयत्नांतून सामुहिक पाणीपुरवठा योजनेचा अडसर दुर

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः सामूहिक पाणी योजनांच्या (Water Supply) पाणीपट्टीची थकबाकी ही ग्रामीण पाणी पुरवठ्यातील अडथळा ठरत असून या संदर्भात जिल्हा परिषद (Zilha Parishad) सदस्य रोहन सतीश पवार यांनी काल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत आवाज उठविला. सामूहिक पाणी योजनेंतर्गत एखाद्या ग्रामपंचायतीकडे थकबाकी राहिल्यास त्या योजनेतील सर्वच गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचे धोरण हे अन्य गावांवर अन्याय करणारे असल्यामुळे रोहन पवार यांनी या संदर्भात पोटतिडकीने प्रश्‍न उपस्थित करीत त्यावर रास्त तोडगा काढण्यास जि.प. प्रशासनाला भाग पाडले.

हेही वाचा: नशिराबाद टोलनाक्यावर रांगाच रांगा..गोंधळमय वातावरणात टोल वसूली

जि.प. जलव्यवस्थापन समितीची बैठक काल झाली. यावेळी पाणी योजनांची थकबाकी हा मुद्दा चर्चेत आला असतांना रोहन पवार यांनी पारोळा तालुक्यातील तामसवाडी बोरी धरणावरून 11 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामूहिक पाणी पुरवठा योजनेबाबत मुद्दा उपस्थित केला. या योजनेंतर्गत तामसवाडी, बोळे, मुंदाणे, करंजी, शेवगे, भोलेतांडा आदी 11 गावांना सामूहिक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एखाद्या गावानेही विज बिल थकविल्यास सर्वच गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याबद्दल तामसवाडी- देवगाव जि.प. गटाचे सदस्य रोहन पवार यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली व या पध्दतीमुळे इतर गावांवर घोर अन्याय होत असल्याचे जि.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

हेही वाचा: अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये शेतशिवार तुडुंब

या योजनेंतर्गत असलेल्या गावांना स्वतंत्र विज बिल देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून इतर गावांवर अन्याय होणार नाही, असा आग्रह धरला. त्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली असून तसा प्रस्ताव लवकरच संमत करण्याची ग्वाही देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, सभापती, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. जि.प. सदस्य रोहन पवार यांनी ज्या पोटतिडकीने हा मुद्दा मांडला व त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाल्यामुळे, तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image
go to top