पाचोऱ्यात राष्ट्रवादीचा हुंकार; आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा 

चंद्रकांत चौधरी
Saturday, 5 December 2020

शिक्षक व पदवीधर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदारांचा व वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलविण्याचा निर्णय घेणाऱ्या मंत्री गायकवाड यांचा व राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव झाला. 

पाचोरा : संभाव्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका प्रचंड मताधिक्क्याने जिंकून पाचोरा मतदारसंघच नव्हे, तर जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असा निर्धार पाचोरा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला. 

वाचा-  आशांकडून बेकायदेशीर पैश्यांची मागणी; ऑडीयो क्लिप व्हायरल -*

महालपुरे मंगल कार्यालयात पाचोरा व भडगाव तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी (ता. ५) दुपारी बैठक झाली. माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, ज्ञानेश्वर महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, योगेश देसले, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, दिव्या पाटील, संजय वाघ, नितीन तावडे, सतीश चौधरी, ललित बागूल, विनय जकातदार, विजय पाटील, विकास पाटील, अजहर खान, मधुकर वाघ, खलील देशमुख, सत्तार पिंजारी, शेख रसूल, नाना देवरे, डॉ. संजीव पाटील, दत्ता बोरसे, सीताराम पाटील, व्ही. टी. जोशी, डॉ. पी. एन. पाटील, बशीर बागवान, ग. स. संचालक गजानन गवारे, सुनील पाटील, हर्षल पाटील, हारुण देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड, शालिग्राम मालकर, संतोष जाधव, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. 

बैठकीत रवींद्र मानकरी, योगेश देसले, विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, कल्पना पाटील, मनीष जैन, दिलीप वाघ, रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. येत्या शनिवारी (ता. १२) होणाऱ्या ज्येष्ठ नेते व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कृषी मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने १२ डिसेंबरला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी घरासमोर रांगोळी काढून घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावून शरद पवार यांनी आपल्या कारकीर्दीत समाजातील प्रत्येक स्तरासाठी घेतलेले धाडसी निर्णय जनमानसात रुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीत आलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी भाजपतील ध्येय-धोरणांसंदर्भात बोचरी टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले समाजोपयोगी कार्य घरोघरी पोचविण्याचा बैठकीत निर्धार करण्यात आला. बैठकीत पाचोरा व भडगाव तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पाटील यांनी आभार मानले. 

वाचा- आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने -
 

हुतात्मा जवानाला श्रद्धांजली 
बैठकीत हुतात्मा जवान यश देशमुख, पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्यासह विविध क्षेत्रांतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शिक्षक व पदवीधर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदारांचा व वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलविण्याचा निर्णय घेणाऱ्या मंत्री गायकवाड यांचा व राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pchora NCP meeting in pachora suggests to be ready for elections