esakal | शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गुगलीने सावद्यात चर्चेला ऊत
sakal

बोलून बातमी शोधा

(Shiv Sena)

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गुगलीने सावद्यात चर्चेला ऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


सावदा : मुख्यमंत्र्यांच्या (CM) उपस्थितीत काही नगरसेवक (Corporator) शिवसेनेत प्रवेश करणार, अशा आशयाचे पोस्टर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक (Facebook) अकाउंटवरून व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे प्रवेशासाठी इच्छूक असलेला हा नगरसेवक कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. सावदा पालिका निवडणूक (Savada Municipality Election) शिवसेना स्वबळावर लढणार, अशी घोषणा आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी नुकतीच केली आहे. सध्या आमदार पाटील यांचे सावदा शहरात येणे जाणे वाढले आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकही पार पडली. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात भेटीगाठी खलबते होत आहे.

हेही वाचा: पांढऱ्या सोन्याला भाद्रपदेची ऊब..!


येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी विश्रामगृहावर पार पडली. या वेळी आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठक दरम्यान येथील एका नगरसेवकाने आमदार पाटील यांची भेटही घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष व राष्ट्रवादीचे काही नगरसेवक हे आमदार पाटील यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे या पैकी कोण नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

हेही वाचा: धुळ्यात रोजचा २०० टन कचरा जागच्या जागी पडून

पोस्टर व्हायरल

शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांच्या फेसबुकवर मुख्यमंत्री महोदय यांचे उपस्थितीत लवकरच मुंबई येथे विद्यमान नगरसेवकांचा शिवसेना पक्षप्रवेश, अशा आशयाचे पोस्टर व्हायरल झाले आहे. गतकाळात मुक्ताईनगर व बोदवड येथील नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता सावदा येथील कोण नगरसेवक प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

loading image
go to top