esakal | वाघोदाच्या ट्रक चालकाचा नाशिकला खून, वैजापूर घाटात मृतदेह फेकला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वाघोदाच्या ट्रक चालकाचा नाशिकला खून, वैजापूर घाटात मृतदेह फेकला

sakal_logo
By
प्रविण पाटील

सावदा: लहान वाघोदा येथील बेपत्ता व अपहरण झालेल्या ट्रक चालक (Truck Driver) याकूब गयासुद्दीन पटेल ( वय -३५ याचा अखेर निर्घुण खून झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील संशयित यांनी त्यास दारूचे नशेत मारहाण करून ठार (Murder) करून औरंगाबाद वैजापूर घाटात (Vaijapur Ghat) मृतदेह फेकून दिलाचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सावदा पोलिसानी ( Savda Police) एकाला अटक केली आहे. इतर दोघे पळून गेले आहेत.

हेही वाचा: धनदाईदेवी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांमध्ये उत्साह

वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल ( वय -३५ ) हा त्याची मालवाहू ट्रक ( एम एच १ ९ सीवाय ६८४३ ) घेऊन जात असताना १५ मे २०२१ सकाळी १० वाजता ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ ( वय -२४ ) रा.दावरवाडी ता.पैठण जि . औरंगाबाद , राजू ठेगडे ( पूर्ण नाव. औरंगाबाद, राजू ठेगडे ( पूर्ण नाव माहीत नाही ) रा. पवन नगर नाशिक आणि संजय ( पूर्ण नाव माहीत नाही ) रा. औरंगाबाद यांनी संगनमताने करून याकूब पटेल यांचे अपहरण नाशिक एमआयडीसी परिसरात घेवून गेले. तेथे तिघांमध्ये दारू पिण्याच्या वादावरून तिघांनी याकुब यांना बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. इकडे याकूब पटेल हे घरी आले नसल्याचे सावदा पोलीस ठाण्यात नसल्याचे सावदा पोलीस ठाण्यात सुरूवातील मिसींग दाखल करण्यात आली.

हेही वाचा: अन् मुख्याध्यापकाचा प्रत्येक दिवस बनला ‘नो व्हेईकल डे’

मोबाईल लोकेशन वरून सापडले धागेदोरे

पोलीसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यामातून याकूब यांच्या संपर्कातील ऋषीकेश शेजवळ याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, राजू ठेगडे ( पूर्ण नाव माहीत नाही ) रा.पवन नगर नाशिक आणि संजय ( पूर्ण नाव माहीत नाही ) रा.औरंगाबाद इतर दोन साथीदारांची नावे सांगितले. पोलीसांनी ऋषीकेशला खाक्या दाखवताचा पोपटासारखा बोलून आम्ही तिघांना दारू पिण्याच्या वादातून बेदम मारहाण करून ठार केल्याची माहिती दिली. त्यानंतर तिघांनी संगनमताने मृतदेह औरंगाबदा वैजापूर घाटात फेकून दिल्याचे सांगितले.

हेही वाचा: धुळे जिल्हातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

दोन जण फरार..

माहितीनुसार पोलीसांनी वैजापूर सावदा पोलीसांशी संपर्क साधला असता एकाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी याकूब पटेल यांचा खून केल्याप्रकरणी तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील इतर दोघेजण अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या ऋषीकेशला न्यायालयाने ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार यांच्यासह सावदा पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

loading image
go to top