esakal | धनदाईदेवी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांमध्ये उत्साह
sakal

बोलून बातमी शोधा

Dhandaidevi Tempal

धनदाईदेवी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांमध्ये उत्साह

sakal_logo
By
दगाजी देवरे

म्हसदी: येथील कुलस्वामिनी, कुलदैवत धनदाईदेवीजवळ (Dhandaidevi) नवरात्रोत्सवात (Navratri festival) विविध कार्यक्रम होतील. गेल्या दोन वर्षांनंतर नवरात्रोत्साठी घट स्थापनेला म्हणजेच सात ऑक्टोबरला राज्यभरातील धार्मिक मंदिर (Tempal) उघडणार आहेत. धनदाईदेवी कुलदैवत असलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाने उत्सवाची जय्यत तयारी केली.

हेही वाचा: धुळे जिल्हातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान


भाविकांमध्ये उत्साह
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून मंदिराचे दरवाजे बंद होते. कोरोना निर्बंधांसाठीचे शासकीय नियमांचे पालन करत शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून जास्त गर्दी न करता भाविकांनी शासनाचे सर्व नियम पाळत देवीचे दर्शन व नवसपूर्तीसाठी सहभागी व्हावे असे आवाहन तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, कोषाध्यक्ष उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने केले आहे. देवीला कुलदैवत मानणारे भाविक राज्यभर आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर देवीजवळ भाविकांची मांदियाळी असणार आहे.

Dhandaidevi

Dhandaidevi


चक्र पूजेस विशेष प्राधान्य
येथील कुलस्वामिनी धनदाईदेवीला राज्यभरात ९६ पेक्षा अधिक कुळाचे भाविक कुलदैवत मानता. दरवर्षी नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन व नवसपूर्तीसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. यंदा शासनाच्या आदेशानुसार घटस्थापनेपासून सर्वच ठिकाणची धार्मिकस्थळ व मंदिरे खुले केली जाणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविक घटस्थापना, देवीला आहेर चढविणे व चक्र पुजा आदी धार्मिक कार्यक्रम करतात. देवीजवळ पाचवी, सातवी माळ व अष्टमीच्या दिवशी भाविक चक्र पूजा करतात. देवीजवळ भाविकांसाठी चोवीस तास मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे.

भाविक केले जातील सॅनिटायझर...
कोरोनाचा धोका लक्षात घेत मंदिरात दर्शनासाठी जाणारे प्रत्येक भाविक सॅनिटायझर केले जातील. अकरा व चौदा ऑक्टोबरची वाढती गर्दी लक्षात दोन दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प होईल. धनदाईदेवी जवळ पहाटे साडे पाचला सामूहिक काकड आरती करण्याची परंपरा आहे. पहाटे पाच पासून विशेषतः स्थानिक भाविक धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. पहाटेच्या सामूहिक काकड आरतीस भाविक विशेष प्राधान्य देतात.

हेही वाचा: धुळ्यात गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात..

यंदा शासकीय नियमांचे पालन करत देवीजवळ विविध कार्यक्रम होतील. भाविकांनी शासकीय नियमांचे पालन करत देवीचे दर्शन घ्यावे.
-सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी.

loading image
go to top