esakal | अश्रूही आटले..आतातरी ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची आर्त हाक
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

अश्रूही आटले..आतातरी ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची आर्त हाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
भडगाव/पाचोरा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmer) पीक पूर्णतः उद्ध्वस्त होऊन असून, खर्च व मेहनतही वाया (Crop Damage) गेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणारे घटक प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेल्या पीकपेऱ्यानुसार तत्काळ रोख स्वरूपाची मदत (Help) शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी भडगाव तालुका भाजप, पाचोरा राष्ट्रवादी यासह गिरणा पट्ट्यातील विविध संघटना, शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा: जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या

भडगाव तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याबाबत तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळण्याकामी शासनाकडे तत्काळ मागणी करण्यात यावी. यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या भरपाईची मदतही तत्काळ मिळावी. तसेच तालुक्यात झालेल्या रस्तानिर्मितीमुळे संबंधित विभागाने सांडवा न काढल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी तुंबल्याने पूर्ण पीक वाया गेले असून, शेतांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत. संबंधित मागण्यांचा योग्य विचार न झाल्यास भडगाव तालुका भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण लिंडायत, युवा मोर्चा अध्यक्ष किरण शिंपी, महेंद्र ततार, सचिन पाटील, बन्सीलाल परदेशी, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, कुणाल पाटील, रतिलाल पाटील, पंढरीनाथ मराठे, विशाल चौधरी, आबा पाटील, दत्तात्रय पाटील, संजय बाग, पांडुरंग मराठे, सुधाकर चव्हाण, यादव मराठे, सुभाष मोरे, सुरेश मराठे, सुर्यभान वाघ, सुरेश नरवाडे, वाल्मिक वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त


सरपंच संघाचे निवेदन
भडगाव तालुक्यात शासनाने भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच संघाच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. नीलकंठ पाटील, विभागीय अध्यक्ष मोहन पाटील (महिंदळे), सुनील वंजारी (पळासखेडे), कमला देसले (सावदे), पूजा पाटील (वलवाडी) सुरेखा पाटील (वडजी), अजय महाजन (पिंपरखेड), शोभा पाटील (आमडदे), विजय पाटील (पांढरद), समाधान पाटील (वडजी), दीपाली पाटील (बोदर्डे), दिव्या पाटील (महिंदळे), नकुल पाटील, वंदना बडगुजर, ज्योती पाटील (वाक) उपस्थिती होते.

loading image
go to top