पैशांसाठी विवाहितेचा छळ; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

married  woman harassment
married woman harassmentesakal
Updated on

एरंडोल (जि. जळगाव) : मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासू, नणंद, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मुल्लावाडा येथील रहिवासी शाहिस्ता इमरानखान पठाण (वय २६, ह. मु. शाहूनगर, नुरानी मशीदजवळ, जळगाव) यांचा विवाह २ मार्च २०१४ रोजी इमरानखान लुकमानखान यांच्याशी झाला होता. शाहिस्ता पठाण यांना तीन अपत्य आहेत. विवाहानंतर एक वर्ष शाहिस्ता यांना पती व सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. मात्र एक वर्षानंतर सासरच्या लोकांनी लग्नात आमचा मानपान झाला नाही, घरगुती सामान कमी दिल आदी विविध कारणांमुळे छळ करण्यास सुरवात केली. माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली.

married  woman harassment
पतीला अनैसर्गिक संबंधाचे व्यसन; पत्नीने विरोध केल्यास...

शाहिस्ता यांची माहेरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तसेच तीन लहान मुले असल्यामुळे तिने सासरच्या लोकांचा त्रास सहन केला. माहेरून एक लाख रुपये आणले नाही तर तुला ठार मारू, तलाक देऊ अशी धमकी सासरच्या लोकांनी दिली. विवाहितेची आई जैब्बूंनीसाबी जळगाव येथे गेल्या असता सासरच्या लोकांनी शाहिस्तेसह तीच्या आईस देखील शिवीगाळ करून मारहाण केली. पती इमरानखान पठाण यांनी तीन वेळा तोंडी तलाक दिला.

married  woman harassment
अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळविले

याबाबत शाहिस्ता इमरानखान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती इमरानखान, सासू बानोबी लुकमानखान, नणंद शबाना आरिफ खान, शमीम रईस खान, दीर शाहरुख लुकमान खान (सर्व रा. शाहूनगर, जळगाव) आणि रुबिना इमरानखान (रा. शिवणा, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील, सुनील लोहार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com