
Jalgaon News : प्रसूतीदरम्यान बाळंतीण दगावली
जळगाव : चिमुकलीला जन्म (Birth) दिल्यानंतर शिवाजीनगरातील विवाहितेचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सातला मृत्यू झाला. (married woman dies during treatment after giving birth to baby girl jalgaon news)
गायत्री सागर जाधव (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. गायत्री जाधव शिवाजीनगरात पती सागर राजू जाधव यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. सागर जाधव संगणक दुरुस्तीची कामे करून उदरनिर्वाह करतात.
प्रसूती कळा सुरू झाल्याने सागर जाधव यांनी पत्नी गायत्रीला मंगळवारी सायंकाळी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. गायत्री यांनी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खालावली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
उपचार सुरू असताना, गायत्रीचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. १) सकाळी दहाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र सोनार तपास करीत आहे.