Latest Marathi News | विवाहिता आढळली जळीत अवस्थेत; घटनेचे कारण गुलदस्त्यात; तपास सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burn Women Found

Jalgaon News : विवाहिता आढळली जळीत अवस्थेत; घटनेचे कारण गुलदस्त्यात

भडगाव : येथील विवाहिता कोठली रस्त्यावरील ओमशांती केंद्र परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून, या घटनेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. ही विदारक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने वेगाने तपासचक्रे फिरवली आहेत.

चाळीसगाव रस्त्यावरील मयुरेश मार्बलच्या मागील भागातील रहिवासी असलेली विवाहिता बुधवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव रस्त्यालगत असलेल्या कॉलनी भागात राहणाऱ्या भावाकडे जाऊन येते, असे सांगून घरातून गेली. (Married woman found burnt Reason of incident not found Investigation begins Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon News : निमखेडी-बांभोरीदरम्यान पूल शक्य, बंधारा नाही!

त्यानंतर पाच ते पावणेसहाच्या दरम्यान ही महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओमशांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली. कॉलनी भागालगत शेतात असलेल्या सालदाराचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. कुटुंबीय तेथे पोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. ही महिला ५० ते ७० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Crime Update : दहशत माजविणाऱ्याला तलवारीसह अटक

दरम्यान, 'त्या' महिलेचा जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, भडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले, की या महिलेचा जबाब घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पालकर यांना जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. त्यांचा जबाब काय येतो? त्यानंतर गुन्हा दाखल येईल. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोघांना अटक