Jalgaon Crime News : हद्दपार संशयिताकडून दरोड्याचा प्रयत्न

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना (Criminal) एमआयडीसी पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली.

अटकेतील एक संशयित चक्क दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला गुन्हेगार असून, तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली. (MIDC police arrested 3 inn criminals with weapons while attempting robbery jalgaon crime news)

‘एमआयडीसी’चे पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, पोलिस कर्मचारी इम्रान सय्यद, मंदार पाटील, चेतन सोनवणे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, संदीप धनगर यांनी रात्री गस्त घालत असताना, शिरसोली रस्त्यावर व्यावसायिक वासुदेव महाजन यांच्या बंगल्याजवळ संशयित विशाल मुरलीधर दाभाडे (वय २४, रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी),

दीपक शांताराम रेणुके (२०, रा. तांबापुरा) आणि गुरुजितसिंग बावरी (२१, रा. शिरसोली नाका, तांबापुरा) यांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता, विशाल दाभाडे याच्याकडे धारदार सुरा, गुरुजितसिंग बावरी याच्याडे मोठा स्क्रू ड्रायव्हर व इतर साहित्य मिळाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime news
Jalgaon Crime News : ...तर तुझ्या भावाला चौकात गोळ्या घालू; घरात शिरून धमकी

हद्दपार संशयित मोकाट

पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने विशाल दाभाडे याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले असून, दरोड्याच्या प्रयत्नात असताना, एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या टोळीतील इतर दोघांना अटक केली आहे. त्यात गुरुजितसिंग बावरी याच्यावर तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत.

crime news
Jalgaon News : शिरसोलीत बिबट्याकडून पाडसाचा फडशा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com