Jalgaon News : बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान

Grant News
Grant Newsesakal

जळगाव : सामाजिक न्याय विभागातर्फे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. (Mini tractors to self help groups 90 percent subsidy Jalgaon News)

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Grant News
Jalgaon News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर जाणार; जिल्हा बैठकीत निर्णय

या योजनेच्या लाभासाठी बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे, तसेच आणि गटविकासाधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बँक खात्यात या योजनेंतर्गत तीन लाख १५ हजार मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख ५० हजार इतकी राहील.

नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १० टक्के हिस्सा स्वतः भरल्यानंतरच ते ९० टक्के अनुदानास पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे संपर्क साधावा.

Grant News
Jalgaon News : रस्त्यांवर कोटिंगचा लेअर टाका; महामार्ग विभाग मक्तेदारांना कळविणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com