Jalgaon News : अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

minor girl

Jalgaon News : अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन (Minor) मुलगी प्रसूत झाली. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. (minor girl gave birth to child after being raped as lure for marriage jalgaon crime news)

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनिस शरीफ भिस्ती याची ओळख झाली. त्याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सुप्रिम कॉलनीत एका घरात तिला नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व नुकताच तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर पीडित मुलीशी लग्न करण्याच नकार देत, शिवीगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच फिरोज शरीफ भिस्ती, मेहजमीन रईस भिस्ती, अनवर खान यांनीही पीडित मुलीस मारहाण केली. याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संबंधित चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.