Jalgaon Miyawaki Project : खेडीकढोली परिसरात मियावाकी वन होणार विकसित

Volunteers, students and citizens participating in the tree plantation drive under the Miyawaki forestation Project
Volunteers, students and citizens participating in the tree plantation drive under the Miyawaki forestation Project esakal

Jalgaon Miyawaki Project : जागतिक तापमान वाढीच्या गंभीर समस्येवर स्थानिक पर्याय शोधण्यासाठी वननिर्मिती आणि वनसंवर्धन हाच पर्याय असून, आपण आपण वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे; अन्यथा पुढील पिढीसमोर गंभीर आव्हाने निर्माण होतील,

असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी येथे केले. (Miyawaki Forest will be developed in Khedikdholi area jalgaon news)

एसआयपी अकादमी आणि पर्यावरण शाळेतर्फे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्पाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. एसआयपी अकादमीच्या सीएसआर निधीमधून खेडी (ता. एरंडोल) येथे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. खासदार उन्मेष पाटील अध्यक्षस्थानी होते. केशवस्मृती सेवा संस्थानचे अध्यक्ष भरत अमळकर, माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे, विद्यापीठाचे रजिस्ट्रार विनोद पाटील आदी उपस्थित होते.

खासदारांकडून दहा लाख

खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसहभागातून साकार झालेल्या प्रकल्पाचे कौतुक केले आणि गिरणा नदीच्या खोऱ्यात ठिकठिकाणी मियावाकी वनांचे प्रकल्प उभारले जावेत, असे आवाहनही केले तसेच यासाठी खासदार निधीतून त्यांनी दहा लाखांचा निधीही घोषित केला.

साडेसात हजार वृक्षांची लागवड

वृक्षारोपणाच्या या महाभियानात ७५ प्रजातींच्या साडेसात हजार रोपांची लागवड करण्यात आली. एकाच दिवसात इतक्या व्यापक प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा हा विक्रम ठरला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Volunteers, students and citizens participating in the tree plantation drive under the Miyawaki forestation Project
MP Unmesh Patil : देशभरातील सक्रिय सदस्यांच्या यादीत खासदार उन्मेश पाटील ‘टॉप 10’मध्ये

कार्यक्रमासाठी जळगाव शहरातून अनेक मान्यवर, नागरिक, विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी, एसआयपी अकादमीच्या केंद्रातील विद्यार्थी, भारत विकास परिषद, केशवस्मृती प्रतिष्ठान, वन्यजीव संरक्षण संस्था, विवेकानंद प्रतिष्ठान, उडान आदी संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाचे संयोजक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाकडे भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे ७५ घनवन निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, त्यादृष्टीने कुलगुरूंनी परवानगी दर्शविली असल्याचे श्री. नन्नवरे यांनी सांगितले.

हिरालाल सोनवणे, संदीप झोपे आणि योगेश सोनवणे यांचा या वेळी सत्कार झाला. अर्चना उजागरे आणि वरुणराज नन्नवरे यांनी सूत्रसंचालन केले. पन्नालाल सोनवणे यांनी आभार मानले.

Volunteers, students and citizens participating in the tree plantation drive under the Miyawaki forestation Project
Jalgaon News : महापालिका सभागृह होणार ‘डिजिटल’; 5 कोटींची तरतूद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com