Jalgaon News : शासकीय अभियांत्रिकी, गुरू गोविंदसिंगमध्ये सामंजस्य करार; विद्यार्थी करू शकतात 6 विषयांचा अभ्यास

At the time of MoU, Principal of Engineering Dr. G. M. Malwatkar and SGGSIET Director Dr. M. B. Lamb etc.
At the time of MoU, Principal of Engineering Dr. G. M. Malwatkar and SGGSIET Director Dr. M. B. Lamb etc. esakal

Jalgaon News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (जळगाव) व नांदेड येथील श्री गुरू गोविदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी यांच्यात शैक्षणिक बाबींबाबत सामंजस्य करार झाला. (MoU in Government Engineering Guru Gobind Singh college jalgaon news)

शासकीय अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर व नांदेडच्या एसजीजीएसआयईटीचे संचालक डॉ. एम. बी. कोकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. कराराच्या मुख्य उद्देशानुसार दोन्ही तंत्रज्ञान संस्था परस्पर हिताच्या क्षेत्रात विविध सहयोगी कार्यक्रम राबविणार आहेत. मुख्यतः दोन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट एकमेकांसोबत ट्रान्सफर होऊ शकतात.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इच्छुक, निवडलेले विद्यार्थी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन, संगणक अभियांत्रिकी या विषयाच्या एका संपूर्ण सेमिस्टरसाठी एसजीजीएसआयईटीत अभ्यास करू शकतील किंवा नांदेड येथील इच्छुक विद्यार्थी जळगाव येथे संपूर्ण सेमिस्टरचा अभ्यास करतील.

परिणामी, त्या सेमिस्टरच्या सर्व क्रेडिट्सचे परस्पर संस्थांमध्ये हस्तांतरण होईल. दोन्ही संस्थांमध्ये संशोधन प्रकल्पांवर संयुक्तपणे काम करणे शक्य होणार असून, विविध निधी एजन्सींतर्गत संशोधन सादर करणे सोपे होणार आहे. सल्लागार असाइनमेंट, प्राध्यापक, कर्मचारी विकास कार्यक्रम, सहयोगी प्रकाशने एकत्रितपणे करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

At the time of MoU, Principal of Engineering Dr. G. M. Malwatkar and SGGSIET Director Dr. M. B. Lamb etc.
Jalgaon Rain Damage : यावलला वादळी पाऊस; केळीच्या बागा आडव्या

उच्च शिक्षणासाठी अर्थात एम.टेक. किंवा पीएच.डी. प्रवेशासाठी दोन्ही संस्थेचे प्राध्यापक तथा कर्मचारी त्यांच्या पूर्ण पात्रता निकषांच्या अधीन राहून आणि वेळोवेळी मंजूर केल्यानुसार संस्थांच्या निवड प्रक्रियात भाग घेऊ शकतात. दोन्ही संस्था स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट एकमेकांसोबत हस्तांतरण करू शकतात.

करारानुसार दोन्ही संस्था सेंटर्स ऑफ एक्सलन्स (सीओई)च्या स्थापनेसाठी सहयोगी प्रयत्न करणार आहेत. ‘केस टू केस’ आधारावर ठरल्याप्रमाणे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची सामंजस्याने देवाणघेवाण करता येणेही शक्य होणार आहे. संस्थांच्या उपक्रमांना विद्यार्थी, प्राध्यापकांना उपस्थित राहणे सोयीचे होणार आहे.

सामंजस्य करार नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची उद्दिष्टे सामोरे ठेवून केला आहे. कराराबाबत नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन, तंत्रशिक्षण संचालनालयाचे चालक डॉ. विनोद मोहीतकर आदींनी आनंद व्यक्त केला. सामंजस्य करारावेळी नांदेड येथील माजी संचालक प्रा. एल. एम. वाघमारे, प्रा. प्रकाश जाधव, अधिष्ठाता डॉ. ए. बी. गोंडे, प्रा. अरुण डोंगरदिवे आदी उपस्थित होते.

At the time of MoU, Principal of Engineering Dr. G. M. Malwatkar and SGGSIET Director Dr. M. B. Lamb etc.
Jalgaon News : चाळीसगावातील मोहिमेनंतरही अतिक्रमणाची डोकेदुखी कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com