Jalgaon News : सायकलवरुन गाठणार माऊंट एव्हरेस्ट; गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा जागर

Officials of Durgsevak, Cyclist Group and Swimming Club along with Dilip Ghorpade present at the reception of Cyclist Subodh Gangurde.
Officials of Durgsevak, Cyclist Group and Swimming Club along with Dilip Ghorpade present at the reception of Cyclist Subodh Gangurde.esakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : छत्रपती शिवरायांच्या तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा जागर आणि इतिहासाचा प्रसार करीत रायगड जिल्ह्यातील रोहा येथील २४ वर्षीय तरुण सुबोध गांगुर्डे

हा सायकल प्रवासाद्वारे महाराष्ट्रातील ३७० किल्ले सर करून माउंट एव्हरेस्टवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी निघाला आहे. (Mount Everest will be reached by bicycle Jagar for conservation of forts by subodh gangurde jalgaon news)

या तरुणाचे शहरात आगमन होताच येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, सायकलिस्ट ग्रुप व स्विमिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

सुबोध गांगुर्डे या सायकलवीर तरुणाने अहोरात्र प्रवास करून आपले ध्येय गाठण्याचे ठरवले आहे. २६ नोव्हेंबरला त्याने सायकलने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आजपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातील गड किल्ले सर करीत तो चाळीसगावला पोहोचला.

यावेळी येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी राज्यध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी त्याच्या आगमनाची माहिती सहकाऱ्यांना दिली. त्यानुसार, दुर्गसेवक तसेच सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य व स्विमिंग असोसिएशनच्या सदस्यांनी सुबोध गांगुर्डेचे स्वागत करुन सत्कार केला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Officials of Durgsevak, Cyclist Group and Swimming Club along with Dilip Ghorpade present at the reception of Cyclist Subodh Gangurde.
Road Construction : शहरातील रस्ते कोटिंगअभावी उखडले; नागरिकांना त्रास

यावेळी बोलताना सुबोध गांगुर्डे याने सांगितले, की माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे माझे स्वप्न होतेच. परंतु ते करण्याआधी आपल्या महाराष्ट्रातील मराठी मातीच्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सफर करून त्या किल्ल्यांची आजची अवस्था प्रत्यक्ष छायाचित्रे व व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोचावी आणि यातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी हा उद्देश घेऊन ३६५ दिवसात ३७० किल्ले पूर्ण करून रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले.

आता माउंट एव्हरेस्ट शिखरावर भगवा फडकवावा, असा माझा मानस आहे. गेल्या काही दिवसांपासून खानदेशातील कळवण, सटाणा, देवळा या भागातील सातमाळ डोंगररांगेतील किल्ले तसेच शैलबारी, डौलबारी, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच चाळीसगाव परिसरातील सर्व किल्ल्यांवर तो जाऊन आला आहे. पुढे संभाजीनगरकडे रवाना होत आहे.

आज त्याचा प्रवासातील ११५ वा किल्ला पूर्ण झाला असून त्याच्या या दृढ निश्चयाचे आणि मेहनतीचे महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून कौतुक होत आहे. ठिकठिकाणी त्याचे स्वागत केले जात आहे. आपल्या प्रवासादरम्यान तो किल्ल्याच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये देखील किल्ल्यांबाबत जनजागृतीचे कार्य करीत आहे.

Officials of Durgsevak, Cyclist Group and Swimming Club along with Dilip Ghorpade present at the reception of Cyclist Subodh Gangurde.
Jalgaon News : तळमजल्यावरील दुकानांच्या कारवाईत भेदभाव; डी. एच. प्लाझावर कारवाई

त्याच्या स्वागतप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी राज्याध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, सचिन पाटील, विनोद शिंपी, नाना चौधरी, जितेंद्र वरखेडे, पप्पू पाटील, जितू वाघ, समीर शिंपी, सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष दीपक देशमुख, जिजाबराव वाघ, आप्पा भालेराव,

शांताराम पाटील, योगेश पवार, राजेंद्र वाणी, हर्षल पाटील, रवी पाटील, दीपक पाटील, केतन बुदलखंडी, सोपान चौधरी, अरुण महाजन, किशोर महाजन, टोनी पंजाबी, भूषण कायस्थ, स्विमिंग क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मांडे, राजेंद्र बाफना, रणजित पाटील, महेंद्र चौधरी, शाम जाधव, मंगेश पाटे, पंकज रुणवाल आदी उपस्थित होते.

Officials of Durgsevak, Cyclist Group and Swimming Club along with Dilip Ghorpade present at the reception of Cyclist Subodh Gangurde.
Jalgaon Crime News : पिस्तूल, काडतूस घेत दहशत माजविणाऱ्याला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com