Unmesh Patil : प्रकल्प प्रलंबित ठेवून मलिदा खाणारे जनतेला माहिती : खासदार उन्मेष पाटील

unmesh patil and eknath khadse
unmesh patil and eknath khadse

Unmesh Patil : आमच्या कार्यकाळात आम्ही वरखेडे- लोंढे, शेळगाव बॅरेज, वाघूर धरण आदी प्रकल्प पूर्ण केले आहेत. परंतु काहींनी तर प्रकल्पाचा नारळ फोडून तो प्रलंबीत ठेवून मलिदा खाऊन घेतला आहे. असे कोण आहेत ते जनतेलाही माहीत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार उन्मेष पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांना पत्रकार परिषदेत सोमवारी (ता.२७) लगावला.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे, डॉ. राध्येश्‍याम चौधरी, रोहित निकम आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी आमदार खडसे यांनी तीन मंत्री व खासदार असताना एक प्रकल्प पूर्ण झाल्याचे दाखवा, असे आव्हान दिले आहे. (MP Unmesh Patil statement on eknath khadse nashik news)

त्याला उत्तर देताना खासदार पाटील म्हणाले की, आमच्या कार्यकाळात वरखेडे लोंढे, शेळगाव व वाघूर प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्राच्या तसेच इतर निधीतून आम्ही ते पूर्ण करून घेतले आहेत. परंतु काहींनी प्रकल्पाचे नारळ फोडले, ते प्रकल्प प्रलंबित ठेवले आहेत. परंतु त्यांचा मलिदा खाऊन घेतला आहे.

मुक्ताईनगर, फैजपूर कारखाना विकला का गेला? याचीही माहिती जनतेला देऊन खडसे यांनी जनतेची माफी मागावी, असे आवाहनही त्यांनी केले. एकनाथ खडसे हे काहीही बोलून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत असतात, असा आरोपही त्यांनी केला. खडसे यांनी जिल्ह्यात वाद उभे न करता विरोधी पक्षाच्या माध्यमातून विकासाची कामे कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे त्यांना आपले आवाहन असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

जानेवारीत विमानतळ सुरू होणार

जळगाव विमानतळावरून जानेवारी महिन्यात प्रवासी विमान सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली, याबाबत ते म्हणाले, ‘प्लस- ९१’ कंपनीला प्रवासी विमान सुरू करण्याचे लेटस ऑफ ऑर्डर देण्यात आले आहे. जळगाव ते पुणे, जळगाव ते गोवा व जळगाव ते हैदराबाद विमानसेवा किफायतशीर दरात सुरू करण्यात येणार आहे. केंद्रांच्या ‘उडान’ सेवा अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

unmesh patil and eknath khadse
Eknath Khadse: फडणवीसांनी शब्द पाळण्यासह महाजनांनी... एकनाथ खडसेंचे मराठा आरक्षणावर विधान

हेलिकॉप्टर प्रशिक्षण सुरू होणार

जळगाव विमानतळावर विमान चालविण्यासाठी वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पाच विमाने आहेत. या प्रशिक्षणाची तिसरी बॅचही आता बाहेर पडत आहे. लवकरच या ठिकाणी हेलिकॉप्टर चालविण्याची प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे जळगावचे नाव या क्षेत्रातही उंचावणार आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बुधवारी जिल्ह्यात

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी (ता.२९) ला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते जळगाव व रावेर लोकसभा क्षेत्रात दौरा करणार आहेत. ‘घर चलो अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ते ‘सुपर वॉरिअर्स यांच्यांशी चर्चा करणार आहेत.

बुधवारी (ता.२९) सकाळी चाळीसगाव, पाचोरा व पारोळा भडगाव तर दुपारी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा क्षेत्रात ते प्रचार फेरी काढणार आहेत. गुरुवारी (ता.३०) रावेर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात फिरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

unmesh patil and eknath khadse
Devendra Fadnavis यांचा ‘संकटमोचक’ भिडला, Sharad Pawar यांच्या पठ्ठ्यानं खडसावलं |Eknath Khadse vs Girish Mahajan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com