Municipal Fire Brigade Funding : महापालिका अग्निशमन दलाचा कोटीचा निधी चोपड्याला वळविला

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon News : महापालिकेला अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, तो निधी चोपडा नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे.

अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्हा प्रशासनाने महापालिकेला त्याबाबत प्रस्ताव दिला. (Municipal fire brigade funds of crores were diverted to Chopda jalgaon news)

महापालिकेने पिंप्राळा येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव तयार केला व महासभेत मंजुरी घेऊन शासनाला पाठविला होता. त्यात महापालिकेने ३० लाख रुपये अधिक मंजूर करून एक कोटी ३० लाखांचा प्रस्ताव तयार केला होता.

पिंप्राळा येथे अग्निशमन केंद्र मंजूर केले होते. त्यासाठी जागाही निश्‍चित केली होती. त्यालाही मंजुरी देऊन जिल्हाधिकाऱ्याकंडे प्रस्ताव सहीसाठी ठेवला होता. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने हा निधी चोपडा येथे वळविण्यात आल्याचे सागंण्यात आले.

चोपडा येथे काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. त्यावेळी जीवितहानीही झाली होती. त्यामुळे तेथे अग्निशमन निधीची गरज असल्यामुळे त्या नगरपालिकेसाठी हा निधी वळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
MGNREGA : 10 हजारांवर मजुरांच्या हाताला काम! मजुरांची संख्या वाढली

दरम्यान, जळगाव शहरातही अग्निशमन दल तोकडेच आहेत. शहर मोठे असताना, या ठिकाणी सहा ते सात अग्निशमन केंद्रांची गरज आहे. मात्र, सध्यास्थितीत तीनच अग्निशमन केंद्र आहेत. त्यामुळे जळगावला अग्निशमन केंद्रासाठी निधी गरजेचा आहे.

पिंप्राळासारख्या लोकवस्तीच्या भागात एक अग्निशमन केंद्र आवश्‍यक आहे. शासनातर्फे या वर्षी येणारा निधी पिंप्राळ्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

"शासनाने निधीचा प्रस्ताव दिल्यानंतरच पिंप्राळा येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. लोकसंख्येच्या गरजेनुसार त्याला मंजुरीही मिळाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने अचानक हा निधी चोपडा पालिकेकडे वळविला आहे. जळगावची लोकसंख्या लक्षात शासनाने हा निधी जळगावला देण्याची गरज होती." -कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव

Jalgaon Municipal Corporation
2000 Rupees Note Exchange : सराफांच्या ‘दारी’ अन्‌ ‘बँकांतही’ 2 हजारांच्या नोटा; सोन्याच्या विक्रीत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com